🥆 रायफल चोरी : अवघ्या तीन तासात पोलिसांनी आरोपीस पकडले : वाचा सविस्तर :चंद्रपूर जिल्ह्यातील रायफल चोरी #rifle - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


🥆 रायफल चोरी : अवघ्या तीन तासात पोलिसांनी आरोपीस पकडले : वाचा सविस्तर :चंद्रपूर जिल्ह्यातील रायफल चोरी #rifle

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गडचांदूर – 


उपरवाही येथील नारायण कटारिया यांच्या घरी 6 जानेवारीला रात्री 8 ते 8.30 वाजेदरम्यान काही अज्ञात व्यक्ती नी घरात प्रवेश घेत परवाना युक्त टलबोर रायफल लंपास केली.

याची तक्रार कटारिया यांनी पोलीस स्टेशनला दिली असता गडचांदूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी त्या रायफलचा आरोपिकडून कोणत्याही गुन्ह्यात उपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना अलर्ट केले.

राजुरा व गडचांदूर पोलिसांनी या कारवाईत एकत्र येत फिर्यादीकडून आरोपींचे वर्णन याची संपूर्ण माहिती घेत चंद्रपूर, नागपूर शहर व ग्रामीण पोलिसांना याबाबत कळविले.

अखेर त्या 3 आरोपींना देवलापार- मध्य प्रदेशच्या सीमेवर अटक करण्यात आली, सदरचे तिन्ही आरोपी हे मूळचे हरियाणाचे आहे. आरोपिकडून रायफल जप्त करण्यात आली असून ह्या कारवाईत आरोपींना अवघ्या 3 तासात पोलिसांनी अटक केली.

या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी पोलिसांना वेळीच सावध केल्यामुळे आरोपी पोलिसांना गवसले, काही क्षणाचा विलंब झाला असता तर आरोपी राज्याच्या सीमेबाहेर गेले असते.

ह्या संयुक्त कारवाई गडचांदूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, राजुरा पोलीस, नागपूर शहर व ग्रामीण पोलीस आणि चंद्रपूर सायबर पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावली.

Pages