सावित्रीबाई फुले जयंती निमीत्त महिला शिक्षण दिन कार्यक्रम संपन्न राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे आयोजन #savitrijyoti - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


सावित्रीबाई फुले जयंती निमीत्त महिला शिक्षण दिन कार्यक्रम संपन्न राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे आयोजन #savitrijyoti

Share This
खबरकट्टा / चंद्रपुर (प्रतिनिधी) :रविकांत वरारकर -

राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघातर्फे सावित्रीबाई फुले जयंती निमीत्त महिला शिक्षण दिन कार्यक्रम स्थानिक जनता शिक्षण महाविद्यालयातील श्रीलीला सभागृहात घेण्यात आला.


सदर कार्यक्रम हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव सचिन राजुरकर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.

आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन तथा माल्यार्पण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या कार्याची महती विषद केली. आजच्या स्त्रीयांनी सावित्रीबाईंच्या कार्याचे महत्व जाणून सावित्रीबाईंच्या विचारांना अंगिकारावे, असे सांगण्यात आले. सावित्रीबाईंच्या कार्याचा ध्यास घेवुन व त्यांनी केलेलया स्त्रीयांच्या हक्क तथा अधिकारांसाठी संघर्ष करण्याची वृत्ती ओबीसी महिलांनी अंगी बाणावी, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या जिल्हाध्यक्ष प्रा. जोत्सना लालसरे-राजुरकर, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महिला महासंघाच्या रजनी मोरे, पोर्णिमा मेहरकुरे, प्रा. कविता रंगारी, प्रा. महानंदे, मंजूषा फुलझेले, प्रा. माया धमगाये, विजया बोढे, प्रा. मंजूळा डुडुरे, प्रा. विद्या शिंदे, योगिता रायपुरे-उमरे, आदी मंचावर उपस्थित होत्या.

या कार्यमाचे आयोजन राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, राष्ट्रीय ओबीसी युवा विद्यार्थी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महिला महासंघ, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ यांच्या तर्फे करण्यात आले होते.यावेळी मोठ्या संख्येने महिला व विद्यार्थीनी उपस्थीत होत्या.


Pages