*चंद्रपूर शहर काँग्रेस तर्फे "महिला शिक्षक दिवस" साजरा #savitrijyoti-fule - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


*चंद्रपूर शहर काँग्रेस तर्फे "महिला शिक्षक दिवस" साजरा #savitrijyoti-fule

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


आज दि.03/01/2021 ला चंद्रपुर शहर महिला कांग्रेसच्या वतीने तुकुम प्रभाग-5 येथे पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 190वी जयंती साजरी करण्यात आली.

तसेच आजचा दिवस "महिला शिक्षिका दिवस"साजरा करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला त्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेसच्या सचिव नम्रताताई ठेमसकर यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी महिला कांग्रेसच्या शहर अध्यक्षा सुनिता अग्रवाल, ब्लॉक अध्यक्ष शितल कातकर,जिल्हा उपाध्यक्ष तसेच जिल्हा समन्वयक सुनिता धोटे,शहर सचिव ॲड वाणी दारला,सहसचिव त्रिष्णा वरघने,सुनंदाताई धोबे,कल्पना गिरटकर,विजय धोबे,डाहुले सर,इंदिरा चोपकर,मंदा सोयाम,वंदना वाढई,रजनी चन्ने,व महिला कांग्रेसच्या कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

Pages