"शाळा बंद शिक्षण सुरु" या उपक्रमांतर्गत कोरोना ताळेबंदी काळात उत्कृष्ठ कार्य करणा-या व इतरांना प्रेणादायी ठरलेल्या मुख्याध्यापकांचा सत्कार
खबरकट्टा /चंद्रपूर :
कोरोना वैश्विक महामारीनंतर पहील्यांदाच प्रत्यक्ष शैक्षणिक चर्चासत्र शिक्षण परिषदेच्या रुपाने वायगाव व मुधोली केंद्रांतर्गत शिक्षकांची पहिली शिक्षण परिषद जि.प.उ.प्रा.शाळा,चंदनखेडा येथे संपन्न झाली.
या शिक्षण परिषदेचे अध्यक्ष म्हणून मा.साधनाताई धाईत मु.अ.चंदनखेडा तर प्रमुख अतिथी म्हणून भद्रावती सरपंच संघटनेचे अध्यक्ष मा.नयनजी जांभुळे,सरपंच चंदनखेडा,मा.धनपाल फटींग ग.शि.अ व मान.डाँ.प्रकाश महाकाळकर शि.वि.अ.व श्री. यशवंत महाले, श्री.शांताराम कुमरे , श्री. मोरेश्वर विद्दे, केंद्र प्रमुख व सर्व विषयतज्ञ ग.सा.के,भद्रावती हे होते.यावेळी केंद्राचे वतीने कोरोना महामारी काळात चंदनखेडा येथील कोरोना सेंटर संपुर्ण महाराष्ट्रात उत्कृष्ठ ठरले त्याबद्दल मा.नयन जांभुळे सरपंच यांचा सत्कार व इतर मान्यवरांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन केंद्रप्रमुख मा.यशवंत महाले यांचे हस्ते करण्यात आला. "शाळा बंद शिक्षण सुरु" या उपक्रमांतर्गत कोरोना ताळेबंदी काळात उत्कृष्ठ कार्य करणा-या व इतरांना प्रेणादायी ठरलेल्या मुख्याध्यापकांचा सत्कार व सन्मान पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
ह्या शिक्षण परिषदेत NAS परिक्षेसंदर्भात व स्पर्धा परिक्षेसंदर्भात मार्गदर्शन मान्यवर मार्गदर्शकांनी तसेच विषयतज्ञांमार्फत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत महाले कें.प्र.वायगांव यांनी,कार्यक्रमाचे संचालन पंडीत लोंढे वि.शि.चंदनखेडा यांनी तर आभार प्रदर्शन मा.शांताराम कुंभरे कें.प्र.मुधोली यांनी केले.अतिशय खेळीमेळीच्या निसर्गरम्य वातावरणात,काटेकोर वक्तशिर नियोजनबद्धतेत शिक्षण परिषदेचे आयोजन व शेवटी सांगता झाली.परिषदेला जवळपास ५० शिक्षकांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजनाबद्दल उपस्थितांनी कौतुकाचा वर्षाव केला.