ब्रम्हपुरी शहरातील बाजार समिती येथील बैल व्यापाऱ्यांना त्रास देणे पडले महागात......
बाजार समिती प्रशासक यांनी केली मध्यस्थी.....
खंडणी वसूल करण्याऱ्या खंडणी बहादुर तोतया पत्रकारांला बैल व्यापाऱ्यांनी दिली चपराक....
खबरकट्टा /चंद्रपूर :ब्रम्हपुरी:
पत्रकार हा लोकशाहीच्या चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाते. पत्रकार हा जनहिताच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतो. पण काही अनाधिकृत पत्रकार याचा गैरवापर करून स्व:हितासाठी वसुली चा गोरखधंदा सुरू केल्याचे ब्रम्हपुरी शहरात बघायला मिळत आहे.
मागील २४ आक्टोबर ला रविवारी ब्रम्हपुरी येथील बाजार समिती पटंगणावर बैल बाजार भरत असतो. पण काही अनाधिकृत पत्रकार पत्रकाराच्या नावाने खंडणी वसूल करण्याचा धंदा सुरू केला असून कारण नसताना व्यापाऱ्यांना पत्रकार असल्याचे धमकवुन खंडणी मागितली असुन पण व्यापाऱ्यांना खंडणी देण्याची तयारी नसल्याने सदर तोतया पत्रकारांला बाजार समिती च्या मुख्य प्रशासका समोर उभे करून कान उघाडणी केली. सदर खंडणी बहादूर याला मागील पाच ते सहा महिने पुर्वी वडसा येथे मुरम टॅक्टर अडकून खंडणी मागितल्या मुळे बेदम मारहाण करण्यात आली होती. पण हा प्रकरण वडसा येथील वृत्तपत्रात प्रसिद्ध सुध्दा केले होते. पण आता चक्क ब्रम्हपुरी शहरात अनाधिकृत टिव्ही चॅनेल किंवा वेबसाईट पोर्टल च्या तोतया पत्रकारांने धुमाकूळ घातला आहे. हा तोतया पत्रकार मी पत्रकार असल्याचे सांगून खंडणी वसूल करण्यात बहादूर असुन ब्रम्हपुरी तालुक्यातील नागरिकांनी अशा तोतया पत्रकारांपासुन सावध राहण्याची गरज आहे. पोलीस प्रशासनाने अशा अनाधिकृत तोतया पत्रकारावर कारवाई करुन आळा घालणे गरजेचे आहे.