भव्य कृषी महोत्सव 2023 :अयोजक : धनोजे कुणबी समाज मध्यवर्ती समिती अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम सातपुते यांच्या संकल्पनेतून तीन दिवसीय भव्य कार्यक्रमचे अयोजन - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


भव्य कृषी महोत्सव 2023 :अयोजक : धनोजे कुणबी समाज मध्यवर्ती समिती अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम सातपुते यांच्या संकल्पनेतून तीन दिवसीय भव्य कार्यक्रमचे अयोजन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

धनोजे कुणबी समाज मध्यवर्ती समिती द्वारा पुरस्कृत धनोजे कुणबी समाज मंदिर लक्ष्मीनगर चंद्रपूरच्या वतीने दि. १०, ११ व १२ फेब्रुवारी रोजी दररोज सकाळी दहा ते रात्रो दहा वाजेपर्यंत चांदा क्लब ग्राउंड येथे भव्य कृषी महोत्सव २०२३ आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या महोत्सवानिमित्त शेतकरी मेळावा, कृषीविषयक तज्ञांचे मार्गदर्शन, अमृत महोत्सवी सभासदांचा सत्कार, सरपंच परिषद, उद्योजकता मार्गदर्शन, मोफत आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम व उपवर वधू परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. याप्रसंगी १२५ कृषीविषयक स्टॉल लावलेले असेल. तज्ज्ञ मंडळीं विविध विषयावर मार्गदर्शन करतील.

शुक्रवार दि. १० फेब्रुवारी रोजी प्रथम सत्रात सकाळी दहा वाजता कृषी महोत्सवाचे उद्घाटन, कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, मोफत आरोग्य तपासणी, रोगनिदान शिबिर आणि “करियर वाला” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा पालकमंत्री मुनगंटीवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष खा. धानोरकर, मुख्य अतिथी म्हणून आ. जोरगेवार,आ. प्रतिभा धानोरकर, आ. धोटे आ. वंजारी,आ. अडबाले आणि कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अँड. सातपुते उपस्थित राहतील.

याप्रसंगी मुंबईच्या महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे तज्ज्ञ निमंत्रीत सदस्य तथा लेखक डॉ. सुधीर भोंगळे यांचे “पूर्व विदर्भातील शेती मुख्य व तिचा विकास “या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच शेतकरी नेते तथा दैनिक देशोन्नतीचे ‘संपादक प्रकाश पोहरे यांचे “देशाची सदय :कालीन स्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील आव्हाने.” या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी द्वितीय सत्रात शेतकरी बांधव शेती विषय अनुभव कथन करतील.

दि. ११ फेब्रुवारी सकाळी १० वा. प्रथम सत्रात सकाळी दहा वाजता अमृत महोत्सवी सभासदांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते करण्यात येईल. याप्रसंगी अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू भालचंद्र चोपणे तर मुख्य अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अॅड. बाबासाहेब वासाडे उपस्थित राहतील. द्वितीय सत्रात दुपारी एक वाजता सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी उद्घाटक म्हणून माजी खासदार नरेश पुगलिया, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर मालेकर, तज्ज्ञ मार्गदर्शक. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष भरत अप्पा पाटील, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंतदादा पाटील आणि अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य सल्लागार प्रा. राजेंद्र कराडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहतील.

तृतीय सत्रात दुपारी तीन वाजता उद्योजकता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक संतोष कुचनकर यांच्या शुभहस्ते करण्यात येईल. याप्रसंगी अध्यक्षस्थानी सर्च फाउंडेशन व सर्च एम्ब्राडरी अँड स्टिचिंग क्लस्टर फाउंडेशन चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष दिलीप झाडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंटरनॅशनल शिवबासृष्टी राजगडचे संस्थापक लेखक वक्ता उद्योजक व बिजनेस कोच पूणे येथील नामदेवराव जाधव यांचे “व्यवसाय उद्योग क्षेत्रातील संधी व आव्हाने” या विषयावर मार्गदर्शन लाभतील.

दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता कुणबी उपवर वधू परिचय मेळावा व “रेशीमगाठी” विशेषांक प्रकाशन सोहळा आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून आ. धानोरकर व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनोजे कुणबी समाज मंदिर चंद्रपूरचे अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम सातपुते उपस्थित राहतील.

Pages