शेतात जाणाऱ्या शेतकऱ्याचा वाघाने घेतला घास! जंगलात लांब फरफटत नेले.निलकंठ हे जंगलात जात होते. दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक निलकंठ यांच्यावर हल्ला केला.
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वाघाने हल्ला करून एकाला ठार केल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मोहर्ली गावाजवळ घडली. निलकंठ ननावरे (५५) असे मृतकाचे नाव आहे.
निलकंठ हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली गावाजवळ असलेल्या तलावाजवळून जंगलात जात होते. दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक निलकंठ यांच्यावर हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. त्यानंतर त्यांना जंगलात फरफटत नेले. मोहूर्ली 1 बिटातील कक्ष क्रमांक 874 मध्ये बांबू तोडत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने नीलकंठ नन्नावरे यांच्यावर हल्ला केला अचानक झालेल्या या हल्ल्याने जेंगठे यांनी पळ काढला.
या हल्ल्यात नन्नावरे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे व पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
वनविभागाच्या वतीने मृतकाच्या कुटुंबाला 50 हजार रुपयांची मदत करण्यात आली, यावेळी वनविभागाने गावकऱ्यांना जंगलात न जाण्याची विनंती केली आहे.
