वणी तालुक्यापासून काहीच किलोमीटर च्या अंतरावर वाघाची चांगलीच दहशत दिसून येत असताना वाघाने एका गायीला ठार केल्याची घटना उघडकीस आली असून आता वाघाने आपला मोर्चा निलगिरी बन नजीकच्या परिसरात ओढवला असून निलगिरी बनपासून 100 मीटर अंतरावर वाघ पाणी पीत असतानाचे दृश्य वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाले असून आसपासच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा वन विभागाकडून देण्यात आला आहे.
वणीच्या आस पास असलेल्या जंगल परिसरात वाघाचा मनसोक्त फिरण्याचा अंदाज काही निराळाच असून हा वाघ आता धोपटाला परिसरातून निलगिरी बन परिसरा नजीक पोहोचला असून नागरिकांच्या चिंता वाढल्या आहे त्यामुळे वणी वन विभागाने सुद्धा यांवर तातडीने पावलं उचलत कंपार्टमेंट नंबर 613 येथे दोन कॅमेरे तर कंपार्टमेंट नंबर सी10 येथे 2 कॅमेरे असे चार कॅमेरे बसविण्यात आले असून वाघाची शोध मोहीम वन विभाग पूर्ण ताक्तीनिशी करीत असून नागरिकांनी सुद्धा सावधगिरी बाळगावी, रात्र पाळीला शेतकऱ्यांनी झोपेला एक ऐवजी 2 किंवा 3 जण जावे तसेच शेतात काम करीत असताना आवाज करीत काम करावे जेणेकरून प्राणी आपला रस्ता बदलवून त्या जवळ कोणतेही जंगली प्राणी येणार नाही, तसेच अंधार पडायच्या आत घर जवळ करावे व सकाळी सूर्य उघडल्यावरच शेतात जावे, तसेच सोबत सवंगडी ठेवावे जेणेकरून एकमेकांना बोलता यावे.
सदर परिसरात वाघाची दहशत झाल्याने आता नागरिकांनी सुद्धा सतर्कता बाळगणे गरजेचे झाले असून त्यामुळे आसपासच्या खेडयात व जंगल परिसरात रेंजर्स व वनरक्षक सोडले असून वणी वन विभाग वाघाला जेरबंद करण्याच्या पूर्ण तयारीला लागला असून नागरिकांनी सुद्धा सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
नागरिकांनो सावधानपूर्वक ये जा तथा शेतीची कामे करा व सतर्कता बाळगा - सुनील ताजने, वन परिक्षेत्र अधिकारी, वणी
वणीच्या निलगिरी बन पासून 100 मीटर अंतरावर वाघ वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला असून नागरिकांनी आपली सावधगिरी बाळगावी, जंगल ठिकाणी एकटे जाऊ नये, रात्र होण्या आधी कामे उरकवून घरी यावे, सकाळी उजळ पडल्यावर शेतीवर जावे, रात्रपाळी करिता एकटे न जाता सोबत गळी न्यावे व चर्चा करीत शेतकाम करावे तथा तशी काही माहिती असल्यास वनविभागास कळवावे असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी, वणी सुनील ताजने यांनी दैनिक सुपर भारत शी बोलताना सांगितले.
