ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिलेचे वस्त्रहरण ; जातिवाचक शिवीगाळ करीत केली मारहाण ; बामनवाडा येथील घटना #chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिलेचे वस्त्रहरण ; जातिवाचक शिवीगाळ करीत केली मारहाण ; बामनवाडा येथील घटना #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

ग्रामपंचायत कार्यालयासमोर एका महीलेचे वस्त्रहरण केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा तालुक्यातील बामणवाडा येथे घडली.या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.आरोपी सदाशिव गणपत पाल (वय ५२) असे आरोपीचे नाव आहे.ऐवढा गंभीर प्रकार घडूनही पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद केल्याने महीलांनी पोलीस स्टेशनला धडक दिली.



पिढीत महिला आपल्या मुलासह राजुरा पोलीस ठाण्यात सकाळी आठ वाजता तक्रार देण्यासाठी आली असता पोलिसांनी तिच्या मुलाला दोन साक्षिदार आणण्यासाठी गावाला पाठविले आणि याच वेळेत तिच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत तीने सांगितलेल्या घटनाक्रमानुसार तक्रार न घेता आरोपीला पाठीशी घालीत चुकीची तक्रार दाखल करून तिचा अंगठा घेऊन तिला घरी पाठविले. परंतु गावातील महिलांनी एकत्र येत घटनेचे गांभीर्य लक्षात अदखलपात्र गुन्हा नोंद केल्यामुळे गावातील तीस ते चाळीस महिला ठाणेदार विरोधात एकत्र येत पोलीस उपविभागीय कार्यालय राजुरा येथे धडक देत दाखल केलेली तक्रार आम्हाला मान्य नसून पिढीत महिलेच्या म्हणण्यानुसार तक्रार दाखल करून गुंड प्रवृत्तीच्या सदाशिव गणपत पाल या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली.



पिढीत महिलेच्या सांगण्यानुसार (दि. १८) महिलेचा पती देवानंद कामावरून घरी न येता गावात झाडीपट्टी नाटक असल्यामुळे तो रात्री नाटक पाहण्यासाठी थांबला रात्र गेली तरी पती घरी आला नाही म्हणून पिढीत महिला त्याला शोधण्यासाठी ग्रामपंचायत परिसरात आली असता तिचा पती व आरोपी पाल हे शेकोटी जवळ बसून असताना पतीला घराकडे येण्याचे सांगितले. सोबत असलेला पाल यांनी पिढीत महिलेला जातीवाचक शिवीगाळ दिली. तो यावरच थांबला नाही तर महिलेचे डोक्यावरील केस पकडून ओढले यात तिच्या डोक्यावरील केस त्याच्या हातात आले, त्यानंतर तिला साडी सुटेपर्यंत मारहाण केली. पती नशेत असल्याने तो घराकडे निघून गेला जवळ असलेल्या नागरिकांनी मध्यस्ती करीत महिलेला त्याच्यापासून दूर केले. एवढा मोठा गंभीर प्रकार असताना राजुरा ठाणेदार गुन्हेगारांना का पाठीशी घालत आहे असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडत आहे.



उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी ठाणेदाराशी चर्चा करून महिलांना पोलीस स्टेशनमध्ये पाठविले तेव्हा ठाणेदार यांनी पिढीत महिलेची तक्रार घेतली परंतु आरोपीवर गुन्हा दाखल न करताच त्यांना पाठविल्याने आरोपीवर जातीवाचक शिवीगाळ व विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

Pages