रेतीसम्राट नेत्याची चर्चा; गावागावात रंगतोय प्रश्नांचा बाजार! #khabarkatta #rajura - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


रेतीसम्राट नेत्याची चर्चा; गावागावात रंगतोय प्रश्नांचा बाजार! #khabarkatta #rajura

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : 10 जून 2026

एका विधानसभा क्षेत्रातील गावागावात सध्या एका प्रभावशाली नेत्याबाबत जोरदार चर्चा रंगत आहे. व्यासपीठावर विकासाच्या घोषणा, जनतेच्या हिताच्या गप्पा आणि सोशल मीडियावर जननायकाची प्रतिमा उभी करणाऱ्या या नेत्याबाबत लोकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.#Khabrkatta #chandrapur 

चौकात, टपऱ्यांवर, बाजारपेठांमध्ये आणि गावच्या पारावर एकच चर्चा ऐकायला मिळते — "विकासाच्या नावाने गाजणाऱ्या या नेत्याच्या आसपास नेमकं काय सुरू आहे?"


स्थानिक नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की काही प्रभावशाली मंडळींचे रेती व्यवसायाशी असलेले संबंध आणि त्यातून निर्माण होणारे आर्थिक हितसंबंध याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. यामुळे सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.


विशेष म्हणजे सोशल मीडियावर प्रशासनाला जाब विचारणारे व्हिडिओ, अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करणाऱ्या रील्स आणि जनतेसाठी लढत असल्याचा आव आणणाऱ्या पोस्ट्स सातत्याने झळकत असतात. मात्र गावागावातील लोकांचा प्रश्न वेगळाच आहे — "कॅमेऱ्यासमोरचा आक्रमकपणा आणि प्रत्यक्ष कामगिरी यांचा मेळ कुठे दिसतो?"


या विधानसभा क्षेत्रातील तरुण रोजगाराच्या शोधात भटकत आहेत. अनेक मूलभूत प्रश्न कायम आहेत. त्यामुळे नागरिक विचारू लागले आहेत की, प्रसिद्धीची गाडी वेगाने धावत असताना विकासाची गाडी नेमकी कुठे अडकली आहे?


पर्यावरण, नदीपात्रांचे संरक्षण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापराबाबतही अनेक चर्चा सुरू आहेत. गावागावातील नागरिक पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विकासाच्या कामांचा स्पष्ट हिशेब मागू लागले आहेत.


लोकांमध्ये आता अशी भावना व्यक्त केली जात आहे की, मोठमोठ्या घोषणा, झगमगती पोस्टर्स आणि व्हायरल व्हिडिओंपेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर झालेली कामे अधिक महत्त्वाची आहेत. कारण जनतेला भाषणांपेक्षा परिणाम दिसणे अपेक्षित असते.


त्यामुळे आता या विधानसभा क्षेत्रात एकच प्रश्न वारंवार ऐकू येत आहे — "दादागिरीच्या प्रसिद्धीचा विकास जास्त झाला की जनतेचा?"


राजकारणातील चमकदार प्रतिमा आणि वास्तवातील परिस्थिती यामधील अंतर किती आहे, याचा निर्णय शेवटी जनता आणि काळच करणार असली तरीही मामा-भाच्यांचे राज्य किती काळ टिकवायचे याचा निर्णय मतदार आतापासूनच घेत असल्याचे चर्चेतून समजते. बाकी वाचक समजदार आहेतच!

#खबरकट्टा #चंद्रपूर #sandmafia 

Pages