नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्ष चिरंजीव प्रसाद सप्टेंबर 2020 ला रुजू झाल्यापासून आज दिनांक 28 डिसेंबर ला प्रथमच चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याच्या शक्यतेने अवैध धंद्यांना ब्रेक लागला असल्याचे चित्र चंद्रपूर जिल्ह्यात दिसत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोंबडा बाजार, अवैध दारू विक्री, गांजा, ब्राऊन शुगर, वाळू तस्करी जोरात सुरू आहे. राजकीय उत्तेजनामुळे हा व्यवसाय चालू ठेवण्यात आळा बसलेला दिसत नाही, परंतु 28 डिसेंबरनंतर कोणत्याही दिवशी नागपूरला असलेल्या महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांच्या भेटीने अवैध धंद्याला खीळ घातली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था चंद्रपूर, राजुरा,गडचांदूर, वरोरा, ब्रह्मपुरी व मूल या सहा उपविभाग अंतर्गत 27 पोलीस स्टेशन व 7 उपपोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ठेवल्या जातो.
गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोंबड्यांच्या खेळांवर सट्टे चालविल्या जात असल्याच्या बातम्या तेजीत आहेत. परंतु या कोंबडबाजार ठेकेदारांवर राजकीय आशीर्वाद असल्याने सऱ्हास पणे हे बाजार भरवीत ठेकेदार कुणालाही घाबरत नाहीत.
मात्र आता पोलिस महानिरीक्षकांच्या संभाव्य भेटीमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे संपुष्टात आले आहेत.महानिरीक्षक 28 डिसेंबरनंतर कोणत्याही दिवशी जिल्ह्याला भेट देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
