ब्रेकिंग : डिफेन्स फॅक्टरी मध्ये स्फोट : 1 जखमी #fire - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


ब्रेकिंग : डिफेन्स फॅक्टरी मध्ये स्फोट : 1 जखमी #fire

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : भद्रावती : 


भद्रावती येथील आयुध निर्माणीत दारुगोळ्याचा टाकाऊ स्फोटक माल निकामी करीत असताना त्या स्फोटकांचा अचानक भडका झाल्याने कर्तव्यावर असलेला एक कामगार जखमी झाल्याची घटना आज, सोमवारला सकाळी 9 वाजून 30 मिनिटाचा सुमारास युनिट क्रमांक 3 जवळील बर्निंग ग्राऊंडवर घडली.

निर्माणीतील युनिट 9 मधील कार्यरत लक्ष्मीकांत गजानन आक्केवार (राहणार किल्ला वार्ड भद्रावती) असे जखमी कामगाराचे नाव असून, तो आज दिनांक 11 जानेवारी ला आपला युनिट 9 मधील दारुगोळ्याचा टाकाऊ माल नष्ट करण्याचे काम पार पाडीत असताना तेथील टाकाऊ स्फोटकाने अचानक भडका घेतल्याने तो गंभीर जखमी झाला. 

त्यात त्याच्या शरीराला गंभीर इजा पोहोचल्याने त्यांना सर्वप्रथम आयुध निर्माणीच्या रुग्णालयात नेण्यात आले . नंतरच्या उपचारासाठी त्यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. वृत्तलिहीपर्यंत याबाबतची अधिकची माहिती निर्माणी प्रशासनाकडून जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रशासनाशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही.

Pages