ते पॅराशूट नेमके कुणाचे : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतशिवारात उतरले पॅराशूट :कुतुहलासोबतच भीतीचे वातावरण #parachute - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


ते पॅराशूट नेमके कुणाचे : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतशिवारात उतरले पॅराशूट :कुतुहलासोबतच भीतीचे वातावरण #parachute

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : वरोरा प्रतिनिधी -


वरोरा तालुक्यातील चरूरखटी परिसरातील एका शेतात सोमवारी मोठे पॅराशूट उतरल्याने खळबळ उडाली आहे. प्लास्टिकसारख्या पदार्थाने बनलेल्या या पॅराशूटला कुठून आणि कोणी सोडले याचा शोध घेणे तसेच सदर पॅराशूटने कोणी उतरले तर नाही ना, अशी शंका असल्याने याची चौकशी करणे गरजेचे झाले आहे. 


वरोरा तालुक्यातील चरूरखटीपरिसरात गावापासून उत्तर दिशेला अंदाजे 700 मीटर अंतरावरील सायंकाळ यांच्या शेतात सोमवार, 3 जानेवारी रोजी हा पॅराशूट उतरल्याचे सांगितले जाते. शेतात काम करणारा शेतमजूर तुळशीराम चौधरी यांच्या सकाळी दहा वाजता हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने प्लास्टिकसारख्या पदार्थाने बनलेल्या जाड आवरणाच्या या फुग्यासारख्या दिसणाऱ्या पॅराशूटला गोळाकरून घरी आणून ठेवले. हा फुगा म्हणजे पॅराशूट असल्याचे दिसून येत आहे. याला जाड दोऱ्यांचा आधार होता. 


असे पॅराशूट डोंगराळ भागात किंवा समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांसाठी वापरले जात असल्याचे म्हटले जाते. परंतु, तसा परिसर वरोरा तालुका क्षेत्रात नाही. त्यामुळे हे पॅराशूट संशोधनाचा विषय बनले आहे. 



विमानातून खाली उतरण्यासाठी अशाप्रकारच्या पॅराशूटचा वापर होतो किंवा नाही याची माहिती मिळू शकली नाही. उतरलेल्या या पॅराशूटवर 'यु आर बी ए एन' असे लाल अक्षराने लिहिलेले आहे. 


तसेच काळ्या रंगांनी रंगवलेल्या काही 'सूचनात्मक चिन्हांचा' वापरसुद्धा यावर केलेला आहे. हवेत उडल्यानंतर अंदाजे सहा ते आठ मीटर उंच व चार ते पाच फूट व्यास त्याचा राहत असावा, असा अंदाज आहे. या पॅराशूटने कोणी उतरले तर नाही ना, असा प्रश्न असल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. दरम्यान, सध्या गावात मात्र हा विषय कुतूहलाचा बनला आहे. परिणामी प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन चौकशी करण्याची गरज आहे.

Pages