शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी पंचायत समितीचे माजी सभापती गजानन वल्केवार यांना बस स्टँड समोर झोडपल्याने आज खळबळ माजली.
मूल तालुक्यात सध्या ग्रामपंचायतचे वातावरण सुरू असून शिवसेना ही या निवडणुकीत उतरली आहे. राजोली येथे शिवसेनेने या वेळी प्रथमच उमेदवार उभे केल्याने भाजप अडचणीत आली आहे.
यांच्या कार्यालयासमोर चर्चा करीत असताना तेथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांचे सहित संपर्कप्रमुख व अन्य शिवसैनिकांनी येत मुलचे माजी पंचायत समिती उपसभापती गजानन वल्केवार यांना मारहाण केली. याबाबत शिवसेनेनेच आपला उमेदवार पळवून नेत असल्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
