संत श्री नगाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम उत्साहात साजरा:#bhrahmpuri - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


संत श्री नगाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम उत्साहात साजरा:#bhrahmpuri

Share This


खबरकट्टा /चंद्रपूर: ब्रह्मपुरी


नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी च्या वतीने नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नगाजी महाराज यांची २५५ वी पुण्यतिथी श्री संत नगाजी महाराज देवस्थान कहाली खंडाळा रोड ब्रम्हपुरी उस्ताहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात ख्रिस्तानंद रुग्णालयात रुग्णसेवा व रक्तदान शिबिरापासुन करण्यात आली तर संपूर्ण शहरात बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहरातील समाजबांधवांनी संपूर्ण सलुनचे दुकान बंद ठेवली.त्यानंतर समाजातीलच महिलांनी नगाजी महाराज पुण्यतिथी निमित्त भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

त्यानंतर पुण्यतिथी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्य मार्गदर्शक प्रा. लक्ष्मण मेश्राम सर यांनी केले.तर कार्यक्रमाची प्रास्ताविक ना.युवा आघाडी ब्रम्हपुरी चे सचीव गोलु दिवाकरजी फुलबांधे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.माणीकजी मेश्राम सर यांची उपस्थिती होती,तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. अशोकजी रामटेके उपाध्यक्ष न.प. ब्रम्हपुरी, मा.मनोजजी वठे. न.से. प्रा.डॉ.अशोक सालोटकर सर, केशवजी सुर्यवंशी सर,दत्तुजी मेश्राम सर व ब्रम्हपुरी नाभिक समाजाचे जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

प्रस्तुत कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी तर्फे अध्यक्ष श्री.विलास सुर्यवंशी,अजय खळशिंगे, लक्ष्मण मेश्राम सर,गोलु दिवाकरजी फुलबांधे,विलास दाणे, श्रावण येळणे,पितांबर फुलबांधे, मयुरभाऊ मेश्राम, व सदस्य गण यांनी अथक परिश्रम केले.

Pages