ग्रामायण प्रतिष्ठान चंद्रपूर आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर यांचा संयुक्त उपक्रम
खबरकट्टा /चंद्रपूर :
दीपावलीच्या निमित्ताने घराघरातील प्लास्टिक आणि सर्व प्रकारचा इलेक्ट्रॉनिक कचरा ई-वेस्ट यांचा निचरा करून घरदार स्वच्छ,सुंदर आणि पर्यावरणस्नेही बनवण्याचे अभियान ग्रामायण प्रतिष्ठान आणि अ भा वि प चंद्रपूरने आपल्या सर्वांच्या सहकार्याने हाती घेतले आहे . आपले शहर स्वच्छ, सुंदर विष मुक्त करणे, ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
आपल्या शहरात खालील ठिकाणी प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन केंद्र स्वतःच्या पुढाकाराने सुरू राहणार आहेत. पर्यावरण रक्षणात आपली ही लहानशी पण महत्त्वाची भूमिका जागृत आणि जबाबदार नागरिक म्हणून महत्त्वाची आहे. इतरांसाठी एक चांगला आदर्श पण प्रस्थापित करणारी आहे.
सर्व चंद्रपूर वासियांना नम्र विनंती आपल्याकडील निरूपयोगि प्लास्टिक व इलेट्रॉनिक वस्तुंना, रिसायकलिंग करिता पाठवून या अभियानात आपले योगदान द्यावे.
अभियान अवधी- 30 ,31ऑक्टोबर आणि 1नोव्हेम्बर 2021 वेळ: सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत
संकलन केंद्रे -
👉1) गांधी चौक : पोलिस स्टेशन परिसर
👉 2) समाधी वार्ड : आरोग्यम फार्मेसी (विठ्ठल रखुमाई मंदिर जवळ)
👉 3) अंचलेश्वर गेट : डॉ पालीवाल हॉस्पिटल गुरुद्वारा समोर
👉 4 ) जेटपुरा गेट : पाड्यावरचा चहा
👉 5) वरोरानाका चौक : आय टी आय कॉलेज
👉 6) मूल रोड : आदित्य सेल्स डिस्ट्रिब्यूशन, इंडस्ट्रियल इस्टेट परिसर
👉 7) तुकूम : सौ. मंजुश्री सुभाष कासनगोट्टूवार यांचे ऑफिस गुरूद्वारा रोड
👉 8) रामनगर : गायत्री शक्तीपीठ ,दाताळा रोड
👉 9) सरदार पटेल महाविद्यालय , गंजवार्ड
सुंदर चंद्रपूर विष मुक्त चंद्रपूर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे...धन्यवाद
स्नेहांकित -
अनिल सांबरे अध्यक्ष, ग्रामायण प्रतिष्ठान,डॉ बालमुकुंद पालीवाल ,चंद्रपूर
संपर्क :सौ प्रगति माढई 9561562597,
सौ अंजली हिरूरकर 9822239114,
अनुपम भगत 7972239374
शैलेश दिंडेवार 9763228829
प्रियंका चिताडे 8010968207