खबरकट्टा /चंद्रपूर :
कायदेशीर सल्लागार अॅड मनोज कवाडे आणी अॅड वैशालीताई टोंगे-कवाडे यांची मुलगी सोनिया मनोज कवाडे हि ने कॉमन लाँ ॲडमिशन टेस्ट ( CLAT) ची परीक्षा उत्तीर्ण करून देशातील नामांकित कॉलेज पैकी नागपूर येथील National College of law येथे तिचा एलएलबी ओनर्स साठी प्रवेश मिळाला असून देशातील ६० विद्यार्थ्यांपैकी Adjudication_and_Justice या विशेष अभ्यासक्रम ला चंद्रपूर जिल्ह्यातून एकमेव असल्यामुळे तिचे LEAF (लीफ) LAWYERS EDUCATIONAL AWARENESS FORUM (LEAF) या संघटनेचच्या वतीने सत्कार करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ अधिवक्ता दत्ताजी हजारें जेष्ठ अधिवक्ता पुरुषोत्तम सातपुते लीफ संघटनेचे अध्यक्ष अॅड फराहत बेग तथा जेष्ठ व कनिष्ठ अधिवक्ता या कार्यक्रमाला उपस्थित होते.