निराधारा महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न:#gondpipari - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


निराधारा महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न:#gondpipari

Share This

खबरकट्टा /चंद्रपूर:


नवरात्र उत्सवाचा औचित्य साधून तालुका गोंडपिपरी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने निराधार विधवा श्रीमती सविताताई मेहरकूरे तसेच वडीलांच्या आश्रय नसलेल्या कु. शितल सोनटक्के या महिला सक्षम व्हावे या उद्देशाने व्यवसाय सुरू करण्यासाठी रोख रक्कम व व्यवसायासाठी लागणारे साहित्य देऊन पूढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कु.अल्काताई आत्राम,यूवती महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ स्वातीताई देवालकर, जिल्हा परिषद सदस्या सौ वैष्णवी अमर बोडलावार,सौ सूनिताताई मॅकलवार,गोंडपिपरी महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ अरूणाताई जांभूळकर , जिल्हा उपाध्यक्ष श्री बबनजी निकोडे, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री सूहासजी माडूरवार,श्री बंडूभाऊ बोनगीरवार,श्री चेतन गौर माजी नगर उपाध्यक्ष,श्री गणपती चौधरी व्यसनमूक्ती समितीचे अध्यक्ष, तसेच गोंडपिपरीतील मान्यवर उपस्थित होते.



Pages