शहिद क्रांतिवीर बाबूराव शेडमाके हे देशाचे गौरव - जितेश कूळमेथे:#jitesh -kulmethe - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


शहिद क्रांतिवीर बाबूराव शेडमाके हे देशाचे गौरव - जितेश कूळमेथे:#jitesh -kulmethe

Share This

 

शहिद दिना निमित्य क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आदरांजली

खबरकट्टा /चंद्रपूर :


शहिद बाबूराव शेडमाके यांनी आदिवासी समाजाच्या हक्कासह भारतीय स्वातंत्रपूर्व काळात इंग्रज व्यवस्थेला झुंज देत ब्रिटिशकालीन व्यवस्था हादरवून सोडली ब्रिटीशांसोबत अनेक युध्द लढत त्यांनी देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी संघर्ष केला. त्यामूळे ते केवळ समाजाचे गौरव नसून संपूर्ण देशाचे गौरव असल्याची भावना यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे यांनी व्यक्त केली.

आज गुरुवारी क्रांतीवीर शहिद बाबूराव शेडमाके यांच्या 163 व्या शहिद दिना निमीत्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमात त्यांनी आपल्या भावणा व्यक्त केल्या. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, महिला आघाडीच्या शहर संघटीका वंदना हातगावकर, आदिवासी विभागाच्या महिला प्रमूख वैशाली मेश्राम, नरेश आत्राम, भारत आत्राम, सुनिल मेश्राम, अविनाश मडावी, साहिल मडावी, शुभम मडावी, सोमेश राजगडकर, तेजेंद्र कुळमेथे, सुरज गावळे, विनोद तोडराम, रवि मसराम, भाग्यश्री हांडे, विमल कातकर, वैशाली रामटेके, दुर्गा वैरागडे आदिंची उपस्थिती होती.


शहिद विर बाबूराव शेडमाके यांची पुण्य तिथी शहिद दिन म्हणून साजरी केली जाते. या दिनानिमीत्य जिल्हा कारागृह येथील त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करुन आदरांजली अर्पण करण्यात आली.

Pages