खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूर : चंद्रपूर हा प्रदूषित जिल्हा म्हणून आधीच कुख्यात आहे. आता तर या प्रदूषणाने आपली पातळी ओलांडली आहे. येथील एक पर्यावरण अभ्यासक व दोन डाॅक्टरांनी केलेल्या एका ऑनलाइन सर्वेक्षणातून चंद्रपुरातील ९२ टक्के नागरिकांचा जीव गुदमरत असल्याचे विदारक वास्तव यातून समोर आले आहे. अशा वातावरणात जगण्यापेक्षा दुसरीकडे जागा मिळाल्यास चंद्रपूर हे शहर सोडून जाण्याची तयारीही तब्बल ७० टक्के लोकांनी या सर्वेक्षणातून दर्शविली आहे. या सर्वेक्षणातील ९० टक्के लोक चंद्रपुरातील आहेत.
सर्वेक्षणातून चंद्रपूरकर कसे आरोग्य जगत आहे याचा प्रत्यय येतो. प्रदूषणामुळे अनेक आजार जडले आहे. श्वसनाचे आजार बळावले. इतकेच नव्हे तर प्रत्येक घरातील एकाला तरी हा आजार जडला असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. देशात प्रदूषित जिल्हा म्हणून चंद्रपूरकडे बघितले जाते. मर्यादेबाहेर प्रदूषण ओकणारे येथील उद्योग याला सर्वस्वी कारणीभूत ठरत आहे. हे उद्योग किती फायदेशीर आहे. याची समीक्षा करावी लागेल. हे यातून दिसून येते.
चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. यासंदर्भात एक सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. चंद्रपुरातील प्रदूषणामुळे अनेकांना आजाराचे प्रमाण वाढले आहे. या प्रदूषणावर त्वरित आळा न घातल्यास भविष्यात त्यांचे दुष्परिणाम बघायला मिळणार आहे.- डाॅ. अशोक वासलवार,हृदयरोगतज्ज्ञ, चंद्रपूर
सध्या प्रदूषणाची पातळी ही धोकादायक आहे. यासंदर्भात आता नागरिकांनी स्वत: मत व्यक्त करणे सुरु केले आहे. ६० ते ७० टक्के नागरिकांना विविध आजार जडल्याचे सर्व्हेक्षणात म्हटले आहे. प्रत्येकालाच यामुळे त्रास आहे. भविष्यात यामुळे दुष्परिणाम होऊ नये यासाठी आताच प्रदूषणावर आळा घालणे महत्त्वाचे आहे.- डाॅ. सौरभ राजुरकर, छातीरोगतज्ज्ञ, चंद्रपूर