बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत कारवा जंगल वनपरिक्षेत्रात सफारी पर्यटन सुरू #safari-tourism - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत कारवा जंगल वनपरिक्षेत्रात सफारी पर्यटन सुरू #safari-tourism

Share This

  • बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत कारवा जंगल वनपरिक्षेत्रात सफारी पर्यटन सुरू
  • प्रादेशिक वनविभागांतर्गत येणारे देशातील पहिले सफारी पर्यटन ( बल्लारपूर, कारवा ) पर्यटकांसाठी खुले
  • २५ डिसेंम्बर २०२१ पासून पर्यटन सुरू

खबरकट्टा / चंद्रपूर :

बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कारवा येथे संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या सहभागातून कारवा जंगल वनपरिक्षेत्रात सफारी पर्यटन सुरू करण्यात आले आहे प्रादेशिक वनविभागाअंतर्गत सुरू करण्यात आलेले हे देशातील पहिले सफारी पर्यटन असून शुक्रवारी २४ डिसेंम्बर २०२१ ला या सफारी पर्यटनाचे उदघाटन करण्यात आर असून २५ डिसेंम्बर पासून सफारी पर्यटन नागरिकांसाठी खुले करण्यात येईल विशेष म्हणजे सफारी पर्यटनाच्या माध्यमातून जनतेच्या मनात वन्यजीवांच्या विषयी प्रेम व आस्था निर्माण व्हावी व लोकसहभागातून वनव्यवस्थापन सुलभ व्हावे हा यामागील उद्देश आहे.


बल्लारपूर लगत कारवा हे आदिवासी बहुल गाव असून हे चारही बाजूने जंगलाने व्यापले असून या वनक्षेत्रात वाघ, बिबट, अस्वल, हरीण, चितळ, रानगवे, रानमांजर, नीलगाय, चौसिंगा, राणकुत्रं असे २०० हुन अधिक प्रकारचे पक्षी व विविधरंगी फुलपाखरे आहे या सर्व बाबी लक्षात घेता ग्रामस्थाच्या लोकसहभागातून वन्यजीव व्यवस्थापन, मानव-वन्यजीव सहजीवन व्यवस्थापन करणे, वनांचे शास्वत जतन करणे रोजगार उपलब्ध करून देणे विशेष बाब म्हणजे सफारी पर्यटन सुलभ होण्याच्या दृष्टीने ५० किलोमीटर चे जुने पांदण व बैलगाडीचे रस्त्यांचा वापर करून वनपर्यटनासाठी रस्ते तयार करण्यात आले प्रायोगिक स्तरावर एसयूव्ही खाजगी वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे.


सदर क्षेत्रात प्रवेश शुल्क ६०० रु तर गाईड(मार्गदर्शन) शुल्क ४०० रु व कॅमेरा शुल्क १००/- ठेवण्यात आले असून स्थानिक गाईडना प्रशिक्षित करण्यात आले आहे निकट भविष्यात वन सफारी पर्यटनाची ऑनलाईन बुकिंग www.mytadoba.org या संकेत स्थळावर उपलब्ध असणार आहे विशेष बाब म्हणजे या वन पर्यटनासाठी सकाळी ६:०० ते १०:०० दरम्यान ८ वाहन तर दुपारी २:०० ते ६:०० दरम्यान ८ वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी अमोल कवासे मो.8999363746 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारपूर यांनी केले आहे.

Pages