खबरकट्टा / चंद्रपूर-मूल :
मूल शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चितेगाव येथील एव्हीजी गोट फार्ममध्ये बनावट देशी दारू कारखाना सापडला, त्याच आवारात राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूरद्वारा संचालित, कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाची स्थापना 2003 मध्ये झाली. बनावट दारू कारखाना व महाविद्यालय यांच्या मधोमध फक्त ग्रीन नेट बांधून बनावट कारखाना सुरू होता. असे असताना या बनावट देशी दारू कारखान्याविषयी महाविद्यालय प्रशासनाला थोडीही भनक लागू नये आहे. म्हणजे आश्चर्यच! त्यामुळे बनावट दारू कारखान्याविषयी महाविद्यालय प्रशासन संशयाच्या भोक्यात आहे.
मूल तालुक्यातील चितेगाव येथे बनावट देशी दारूचा कारखाना 25 जानेवारीला सापडला. दुसऱ्याचदिवशी आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन होता. त्यामुळे सर्वत्र प्रजासत्ताक दिनाची तयारी 25 जानेवारीला केली जाते. त्यामुळे देशी दारू कारखाना परिसरातील या महाविद्यालयातही प्रजासत्ताक दिनाची तयारी होणे अपेक्षित होते.
मात्र उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने कारवाई दुपारी 12 वाजताच्यादरम्यान केली गेली, तरी मात्र या महाविद्यालयाचा एकही कर्मचारी घटनास्थळावर मिळू नये, ही बाब संशयित असून, महाविद्यालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असून या महाविद्यालयात कला महाविद्यालय सुरू असून, या महाविद्यालयात भौतिक सुविधांचा अभाव आहे. जनावरांच्या गोठ्यासारखी या महाविद्यालयाची स्थिती आहे. येथे विद्यार्थी ज्ञानार्जन करतात तरी कसे? बनावट दारू कारखाना व तिथेच महाविद्यालय असल्याने येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का? महिला हिंसाचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतानाच चितेगावातील महाविद्यालयाबाबत प्रशासन गंभीर दिसत नाही.
मागीलवर्षी या महाविद्यालयाला भेट दिली होती, तेव्हा या ठिकाणी दहा-बारा विद्यार्थी दिसून आले. त्यात सर्वाधिक विद्यार्थिनी होत्या. हे महाविद्यालय विनाअनुदानित तत्त्वावर आहे. - वैभव खांडरे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, मूल.

