कोलाम विकास फाउंडेशनचे कुंभारे यांचा अपघाती मृत्यू चंदनवाही गावाजवळ ट्रकला कारची धडक - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


कोलाम विकास फाउंडेशनचे कुंभारे यांचा अपघाती मृत्यू चंदनवाही गावाजवळ ट्रकला कारची धडक

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

कोलाम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणारे कोलाम विकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार विकास कुंभारे हे एका अपघातात गंभीर जखमी झाले होते, उपचार सुरू असतानाच चंद्रपूर येथे त्यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले.

रविवारी गडचांदूर येथून राजुरा येथे कार ने परतत असताना उभ्या ट्रकला धडक दिल्याने चंदनवाहीजवळ अपघात झाला होता. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यांना चंद्रपूर येथे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

विकास कुंभारे हे वेकोलीच्या सास्ती खुल्या कोळसा खाणीत फोरमन पदावर कार्यरत होते. त्यांनी काही वर्षे पत्रकार म्हणूनही विविध वृत्तपत्रात काम केले. दरम्यान, कोलांमाच्या विकासासाठी त्यांनी काम सुरु करून अनेकांना न्याय मिळवून दिला होता.पुढील महिन्यात गडचांदूर येथे कोलाम परिषद होणार होती त्या कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीकारिताच ते गेले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतर जिवती तालुक्यातील कोलामबहुल पड्यांवर पहिल्यांदाच त्यांनी झेंडावंदन करत अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना हे दुर्गम क्षेत्र पायदळी फिरण्यास मजबूर करत विकासाची निकडं लक्षात आणून दिली होती. आता मात्र कोलामांचा आधारच हलवला असल्याने परिसरातील कोलाम बांधवांच्या डोळ्यात अश्रू आहेत.

Pages