जनसेवा विद्यालयात पालक मेळावा व क्रीडा महोत्सव साजरा - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


जनसेवा विद्यालयात पालक मेळावा व क्रीडा महोत्सव साजरा

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर - मुल
जनसेवा ग्रामीण विकास संस्था नांदगाव ता. मुल जि. चंद्रपूर संचालित जनसेवा माध्यमिक विद्यालय दिघोरी तथा जनसेवा कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव च्या संयुक्त विद्यमाने जनसेवा माध्यमिक विद्यालय दिघोरी येथे दि. 10 ते 14 जानेवारी 2023 पालक मेळावा, सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव घेण्यात आला.

यामध्ये दि. 10 ते 12 जानेवारी 2023 ला शालेय विध्यार्थांचे क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या. दि. 13 जानेवारी 2023 ला गितगायन , वक्तृत्व व प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. लगेच दुपारी 12 वाजता पालक मेळावा व बक्षीस वितरण सोहळा घेण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी श्री. एकनाथजी पाल ( अध्यक्ष शा. व्य. समिती दिघोरी) हे होते तर दिघोरी गावच्या प्रथम नागरिक सौ. वनिताताई वाकुडकर सरपंच दिघोरी व श्री. शंकर वाकुडकर( उपसरपंच ग्रा. प. दिघोरी , सौ. दर्शनाताई वाकडे (उपाध्यक्ष माता पालक संघ) यांची उपस्थिती होती तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. किशोर उरकुंडवार सर, श्री. शनगरवार सर यांची उपस्थिती होती

श्री उरकुंडवार सर यांनी शिक्षणाशिवाय पर्याय नाही व बहुजन विद्यार्थ्यांनी फुले, शाहू आंबेडकर, माँ जिजाऊ, विवेकानंदाचे विचार अंमलात आणून विद्यार्थ्यांनी आपला बौद्धिक विकास करावा असे मत व्यक्त केले. जनसेवा माध्यमिक विद्यालय दिघोरी येथील कर्मचारी मा. प्रवीण फुलझेले यांच्या सौजन्याने शैक्षणिक सत्र 2021-2022 मधील दहावीतील गुणवंत विद्यार्थिनी कु. तनवी गजानन सोनटक्के व कु. आचल युवराज व्याहाडकर यांचा शील्ड व पुस्तके देऊन गौरव करण्यात आला
तसेच मा. उरकुंडवार सर यांचे कडून बक्षीस देण्यात आले. दि. 14 जानेवारी 2023 रोज शनिवार ला सायंकाळी 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम( उत्सव जनसेवेचा) घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री. विनोदभाऊ अहिरकर ( अध्यक्ष जनसेवा ग्रामीण विकास संस्था तथा माजी उपाध्यक्ष जि. प. चंद्रपूर) हे होते तर अध्यक्ष म्हणून मा.श्री. रविभाऊ मरपल्लीवार ( अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी पोंभुर्णा) आणि विशेष अतिथी म्हणून मा. सुरेश पा. अहिरकर, सौ. वनिता ताई वाकुडकर सरपंच दिघोरी, मा. पोटे सर, मा. एकनाथ पाल, मा. आशिष अहिरकर, मा, हेपट सर, मा. पिंपळशेंडे सर, मा. चिमुरकर सर. मा. राजेंद्र हरडे, मा. करनु पा. काळे, सौ.दर्शनाताई वाकडे,सर्व सदस्य शाळा व्य. समिती , सर्व सदस्य माता पालक संघ,इत्यादी उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनोज अहिरकर तर जनसेवा महाविद्यालयाच्या प्राचार्या मुरकुटे मॅडम यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालन मा. अविनाश रामटेके व श्री. उंदीरवाडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुरकुटे मॅडम यांनी केले कार्यक्रमात विद्यार्थी पालक व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थिती होती.2023 चा उत्सव जनसेवेचा कार्यक्रम आनंदात व मोठ्या उत्साहात संपन्न झाला.*

Pages