राजुरा विधानसभा क्षेत्रातील चारही तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे #bjp - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


राजुरा विधानसभा क्षेत्रातील चारही तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे #bjp

Share This
आमदार देवराव भोंगळे आणि विवेक बोढे यांच्या मनमानी कारभारामुळे असंतोष उफाळला असल्याची चर्चा.

खबरकट्टा : राजुरा प्रतिनिधी -09 जुलै 2026

राजुरा विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टीचे आमदार देवराव भोंगळे यांना त्यांच्या मतदारसंघात संघटनेचा क्षेत्रात जबर धक्का बसला आहे. त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील राजुरा गोंडपिपरी , कोरपना आणि जिवती या चारही तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या तालुका कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत देवराव भोंगळे यांच्या बेबंदशाहीला आव्हान दिले असल्याचे "जन बदलाव" या पहिल्यांदाच वाचण्यात आलेल्या वृत्तपत्राच्या बातमीमध्ये राजुरा रणसंग्राम या फेसबुक पेजवरून चर्चेला आलेले आहे.

या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार ही धक्कादायक बाब समोर आली आहे. या वृत्तामध्ये कोणाचेही नाव नसले तरीही त्याच्या आशयानुसार आता राजुरा विधानसभा क्षेत्रात चर्चा सुरू झाली असून त्यात चर्चेमधून भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव व आमदार देवराव भोंगळे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे विवेक बोढे यांच्या दडपशाहीमुळे तसेच मनमानी कारभारामुळे त्याचप्रमाणे देवराव भोंगळे व विवेक बोढे यांच्यातर्फे करण्यात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या आर्थिक कोंडीमुळे पदाधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

कोरपना तालुका अध्यक्ष संजय मुसळे यांनी बऱ्याच दिवसांपूर्वी राजीनामा सादर केला होता. परंतु, तो स्वीकार न केल्याने त्यांनी, तत्कालीन (आता स्थगित असलेले ) ग्रामीण जिल्हध्यक्ष हरिश शर्मा यांच्याकडे पाठवला आणि हरिष शर्मांनी तो स्वीकारल्याचे देखील कळते. सोबतच त्यांनी याची प्रत आमदार यांना बायपोस्ट त्यांनी पाठवलेला आहे ही देखील माहिती आहे. त्यांच्या नुसार तालुका अध्यक्षांना मीटिंग घेण्याचा अधिकार नाही. विवेक बोढे जेव्हा सांगतील तेव्हा मीटिंग घ्यायची आणि मिटींगला स्वतः विवेक बोढे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. त्यांच्यासमोरच जे काही आहे ते मीटिंग चर्चा होईल त्यानंतर कोणत्याही नवीन व्यक्तीस ला प्रवेश करवण्यास किंवा कोणालाही कुठलेही काम देण्याची मुभा नाही.कोणाचाही प्रवेश करायचा असेल तर आधी विवेक बोढे यांच्याशी चर्चा करा मग ते आमदारांना सांगतील आणि त्यानंतर ते निर्णय देतील. त्या व्यतिरिक्त कामांचा विषय काढला की वागणूक अरेरावीची आहे, बोलचालीची भाषा आता पूर्णतः बदललेली आहे आणि काम करण्यासारखं पक्षात आता वातावरण उरलेलं नाही असा त्यांचा आरोप आहे. म्हणून निराश होऊन त्यांनी राजीनामा सादर केला असे चर्चेतून कळते.

राजुरा तालुका अध्यक्ष वामन तुराणकर यांनी सुद्धा राजीनामा फेकल्याचे कळते परंतु त्यांना तो त्यांचा तो स्वीकारण्यात आला नाही व त्यांना आता प्रत्येक मीटिंगमध्ये परखड भाषेत मध्ये त्यांच्याशी बातचीत केल्या जात असल्याचे कळते त्यामुळे ते सुद्धा कमालीचे नाराज आहेत आणि कोरपना तालुकाध्यक्षांनी लावलेल्या आरोपाप्रमाणेच यांचे सुद्धा आरोप आहे की पक्षामध्ये काम करण्याचे स्वातंत्र्य व मोकळीक नाहीच, प्रत्येक गोष्ट फक्त विवेक बोढे यांनाच विचारून करावी लागते.

गेल्या बरेच महिन्यांपासून पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये ही असंतोषाची आग धगधगत असल्याचे बोलले जात आहे. संघटनेतील कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकारच उरलेले नाही व हे निर्णय आमदार व त्यांचे निकटवर्तीय विवेक बोढेच घेत असतील तर पदावर राहून उपयोगच काय असा या राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मतदार संघात पक्ष कार्य करायचे असेल तर हाती पैसा लागतो यासाठी कार्यकर्त्यांना कामे द्यावी अशी या पदाधिकाऱ्यांची मागणी असताना ती त्यांना न देता आपल्या मर्जीतील ठेकेदारांना द्यायची असा टक्केवारी प्रणित कार्यक्रम आमदार आणि विवेक बोढे यांच्या माध्यमातून राजरोसपणे चालू आहे. 

त्यामुळे असंतोषाचा भडका उडाला असून यापुढे देवराव भोंगळे प्रणित भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारणीशी आपला संबंध नसल्याचे राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. गोंडपिंपरी तालुक्याचे अध्यक्ष दीपक सातपुते हे देखील या सामूहिक राजीनामा प्रकरणाला कारणीभूत असल्याचे या परिसरात बोलले जात आहे. दीपक सातपुते यांच्या विरोधात जुने पदाधिकारी अमर बोडलावार आदींनी पुढाकार घे तालुक्यातील सर्व जुन्या कार्यकर्त्यांच्या सातपुते यांना पदावरून हटवण्याकरिता स्वाक्षरी घेतल्याचे सुद्धा समजते,यावरून आमदारांनी दीपक सातपुते यांना चांगलेच झापले असता सातपुते यांनी या चिंतेतून मद्यप्राशन करून घरी मारहाण केल्याची घटना सुद्धा या परिसरात चर्चेत आहे. 

पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असंतोष घुमसत असताना आमदारांनी मात्र याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचे बोलले जात आहे. भास्कर येगगेवार या पंचायत समितीच्या माजी सभापती आपल्या बायकोच्या बहिणीवर केलेला अत्याचार व विनयभंग यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाली असल्याचे देखील पदाधिकारी बोलत आहेत. पक्षाची कार्यालये महिला पदाधिकाऱ्यांना बसण्यासाठी योग्य राहिली नसल्याचे पदाधिकारी उघडपणे बोलत आहेत. एकेकाळी महिलांसाठी सर्वात सुरक्षित व मान देणारा पक्ष म्हणून ख्याती प्राप्त असलेल्या भारतीय जनता पार्टीची अवस्था राजुरा विधानसभा क्षेत्रात मलीन झाली आहे त्यामुळे आमदारांना याबाबत जबाबदार धरले जात आहे.

आपण जनतेशी सातत्याने संपर्कात राहतो असा देखावा उभा करणाऱ्या आमदारांचा प्रत्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी कोणताही संपर्क नसून कायम त्यांना टाळण्याची भूमिका आमदार घेत असल्याचे आता राजीनामा देणारे पदाधिकारी जाहीरपणे बोलू लागले आहे. मुळात अपघाताने निवडून आलेल्या देवराव भोंगळे यांनी कार्यकर्त्यांशी प्रेमाचा धागा कधीच जोडला नाही हे यावरून स्पष्ट झाले आहे. 

वास्तविक विवेक बोढे हे घुगुसचे नगरसेवक आहे. आमदार देवराव भोंगळे यांचे सर्व कथित आर्थिक व्यवहार, कामांची देवाणघेवाण विवेक बोढे हेच सांभाळत असल्याचे सर्वश्रुत आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वारंवार अपमानित करणे, त्यांना योग्य सन्मान न देणे, विकास कामांच्या वितरणात सहभाग न देणे या वागणुकीमुळे आमदार देवराव भोंगळे यांच्या विरोधात जनमत निर्माण झाले आहे. त्याचेच पर्यावसन चारही तालुक्यातील भाजपाच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्यात आले आहे. 
याकडे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी व नेतेमंडळी कशा पद्धतीने लक्ष देतात व आमदार देवराव भोंगळे तसेच विवेक बोढे यांच्या मनमानी कारभराला कसे लगाम घालतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टीप : वरील सर्व माहिती जन बदलाव या वृत्तपत्राच्या बातमीची दखल घेऊन राजुरा, गोंडपिपरी,जिवती कोरपणा या चारही तालुक्यातील अनेक पदाधिक अनेक कार्यकर्त्यांची चर्चा केल्यानंतर लिहिण्यात आलेली आहे. यामध्ये कोणताही व्यक्तिगत आकस नसून संपूर्ण वस्तुस्थिती आधारित हे वृत्त प्रसारित करण्यात येत असून या चर्चासंबंधीचे अनेक पुरावे खबरकट्टा कडे उपलब्ध आहेत. 


Pages