जुन्या पेन्शनसाठी राज्य कर्मचारी जाणार संपावर. - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


जुन्या पेन्शनसाठी राज्य कर्मचारी जाणार संपावर.

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
चंद्रपूर : 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन अंशदायी पेंशन योजना लागू केली आहे. ही योजना कर्मचाऱ्यांची हिताची नसून आम्हाला जुनीच पेन्शन योजना सुरू करावी यासाठी कर्मचारी सातत्याने लढा देत आहे.

विविध आंदोलन, मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधले जात आहे. याचाच एक भाग म्हणून पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, राज्य कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. या संपासंदर्भात माहिती देण्यासाठी राज्य कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी विविध जिल्ह्यात जनजागृती सभा घेत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात जनजागृती सभेसाठी राज्य कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महल्ले यांच्यासह अन्य पदाधिकारी जिल्ह्यात आले होते. त्यांनी विविध शासकीय कार्यालयांना भेटी देत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. जोपर्यंत शासन जुनी पेन्शन योजना सुरू करणार नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

दरम्यान, त्यांनी तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी राज्य कर्मचारी संघटनेचे कार्यालय, कृषी विभागासह अन्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांनामार्गदर्शन केले. यावेळी रंजन टिल्लू, संजय खोंडे, गणेश गेडेकर, यशवंत कडू, सुरेश बोभाटे, अरुण राजुरकर आदींची उपस्थिती होती.

विशेष म्हणजे, जुनी पेन्शन लागू करण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत विविध आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या आंदोलनाला अजूनपर्यंत यश आले नाही.

Pages