कुस्तीच्या दंगलीत पिता पुत्राची दंगल...! - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


कुस्तीच्या दंगलीत पिता पुत्राची दंगल...!

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर - चिमूर
चिमूर-हनुमान व्यायाम मंडळ व जोड मारोती देवस्थान गाव तलाव भीसीच्या वतीने भव्य कुस्त्याचा खुला दंगल विठ्ठल रुखमाई देवस्थान येथील परिसरात आयोजन करण्यात आलेले होते. सदर कुस्तीच्या दंगलीत पिता पुत्राचीच दंगल रंगली असून ही पिता पुत्राची दंगल नागरिकांचे आकर्षण ठरली होती.

कुस्तीच्या दंगलीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनराज मुंगले महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस संघटन कमिटी ओबीसी, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अरविंद रेवतकर राष्ट्रवादी कॉंग्रेस कमिटी जिल्हा महासचिव चंद्रपूर, सतीश वारजूरकर अध्यक्ष माजी जिल्हा परिषद चंद्रपूर, गजेंद्र चाचरकर ग्रामविश्व संघर्ष वाहिनी, सचिन गाडिवार सामजिक कार्यकर्ता, प्रकाश राऊत पोलीस निरीक्षक मिसी, ममता डुकरे माजी जिल्हा परिषद सदस्य, गरीबाजी निमजे अध्यक्ष विठ्ठल रुखमाई देवस्थान, प्रदीप कामडी माजी सदस्य पंचायत समिती चिमूर, ईश्वर डुकरे समाजिक कार्यकर्ता भिसी, अहमदजी शेख जेष्ठ नाट्य कलावंत, राजू मिमटे, मिसी पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरमय्ये, पत्रकार प्रमोद राऊत, आनंद भिमटे, मनोज डोंगरे, सारंग भिमटे, ईत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी चे धनराज मुंगले यांनी सांगितले की, कुस्तीच्या दंगली प्रमाणेच सतीश वारजूरकर व मी स्वतः मिळून राजकारणात असाच कुस्तीसारखा दंगल खेळून विरोधकांना चित करू असे अध्यक्षीय भाषणातून सांगितले.

प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे जिल्हा महासचिव अरविंद रेवतकर यांनी सांगितले की, ही कुस्त्याची दंगल दरवर्षी अशीच सुरू राहील व या कार्यक्रमाला आम्ही पूर्ण साम दाम दंड भेद नुसार सहकार्यकरीत राहू. डॉ. सतीश वारजूरकर यानी सुद्धा मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित असणाऱ्या अनेक पाहुणे मंडळीचे मार्गदर्शन झाले.

Pages