रानडुक्कर हल्ला: युवा शेतकऱ्याचा मृत्यु - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


रानडुक्कर हल्ला: युवा शेतकऱ्याचा मृत्यु

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर - गोंडपिपरी 

15 जानेवारी रोजी शेतातून बैलबंडीवरून कापूस भरून आणत असताना समोरून रानडूकराचा कळप आला. व यात युवा शेतकरी तूषार वांढरे वय 32 याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

तुषार वांढरे हा गोंडपिपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे येथील रहिवाशी होता.याची नवेगाव वाघाडे येथे शेती आहे. कापूस आणण्यासाठी तो शेतात गेला होता. बैलबंडीत कापूस भरून तो घरी निघाला. दरम्यानच्या मार्गावरून रानडूकराचा कळप बैलबंडीसमोरून गेला. यामूळ बैल बुजाळले.

यात तुषार खाली कोसळला. त्याच्या छातीवरून बैलबंडीचे चाक गेले. यात तो गंभीर जखमी झाला. गोंडपिपरीच्या ग्रामीण रूग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने चंद्रपूरला स्थानांतरण करण्यात आले. वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

रानटी डूकराच्या हैदोसान शेतकरी बांधव प्रचंड त्रस्त आहेत.अशातच रानडूकरामुळे युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने नागरिकात प्रचंड संताप आहे. तुषारच्या कूटुंबियांना वनविभागाने मदत द्यावी अशी मागणी केल्या जात आहे.

Pages