राधिका दोरखंडे "युवा प्रेरणा पुरस्काराने" सन्मानित - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


राधिका दोरखंडे "युवा प्रेरणा पुरस्काराने" सन्मानित

Share This
 खबरकट्टा/ चंद्रपूर - राजुरा
सांस्कृतिक कार्य तथा मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते पुरस्कार वितरण.
राजुरा येथे आयोजित पहिल्या विदर्भस्तरीय पर्यावरण संमेलनात श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी राधिका अविनाश दोरखंडे हिला सांस्कृतिक कार्य तथा मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते युवा प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित आले.

यावेळी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुयोग धस, माजी आमदार अड. वामनराव चटप, अभिनेता जयराज नायर, स्वागताध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे, दीपक भंवर, सचिन वाघ, युवा स्वाभीमान पक्षाचे सूरज ठाकरे, वंचित बहुजन महासंघाचे भूषण फुसे, डॉ. राजकुमार खापेकर, लताश्री वडनेरे, सतीश धोटे, महाराष्ट्र राज्य पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष बादल बेले, प्रा. डॉ. प्रीती तोटावार व्यासपीठावर उपस्थित होते.
राधिका श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बी. एस.सी.द्वितीय वर्षाला शिक्षण घेत आहे. तिने यापूर्वी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रावीण्य मिळविले.डान्स स्पर्धा,स्वच्छ्ता अभियान, हर घर तिरंगा,श्रमदान, फोटोग्राफी, कोरोना काळात कोविड_१९ मध्ये मास्क वाटप करणे, गावागावात जावून श्रमदान करणे,महाविद्यालयात होणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक गावांना भेटी देत राधिकाने अशा अनेक सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

त्यामुळे तिला महाविद्यालयाच्या वतीने "उत्कृष्ट स्वयंसेवक सन्मान" देऊन यापूर्वी गौरविण्यात आले आहे.यासोबतच नुकतीच सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 13 वी सामाजिक व सांस्कृतिक उत्कर्ष स्पर्धा सोलापूर येथे पार पडली.यात राधा दोरखंडे हिने छायाचित्रण स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला.राजुरा येथे पहिल्या विदर्भ स्तरीय पर्यावरण संमेलनात राधिकाला "युवा प्रेरणा पुरस्काराने" सन्मानित करण्यात आल्याने तिचे कौतुक करण्यात येत आहे.

Pages