बेपत्ता : सायकल घेऊन निघालेला तरुण बेपत्ता - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


बेपत्ता : सायकल घेऊन निघालेला तरुण बेपत्ता

Share This
खबरकट्टा/चंद्रपुर:
चंद्रपुर शहरातील रितेश जांगीड वय 16 वर्ष रा. भालचंद्र प्लाझा, वडगाव, चंद्रपुर हा घरून सायकल घेऊन आजोबा कडे जातो असे आईला सांगून गेला परंतु दोन दिवस झाले तरीही घरी परतला नाही, घरच्यानी शोध घेतला परंतु काहीही पत्ता न लागल्याने रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 5 फेब्रुवारी रोजी प्रल्हाद जागींड यांनी तक्रार दिली की त्यांचा पुतण्या रितेश जागींड वय 16 वर्ष याने दिनांक 5 फेब्रुवारी रोजी आपल्या आईला मी आजोबाला भेटून येतो असे सांगून सायकलने गेला संध्याकाळ झाली तरीही घरी परतला नाही करिता त्याला कोणीतरी फूस लावून पळवून नेले असावे अशी तक्रार दिली.

मुलाचे वर्णन गोरा रंग, उंची 5 फुट 5 इंच, सळपातळ बांधा, लांब चेहरा, काळे केस, हातात घडी घातलेली, अंगात हिरव्या रंगाचा शर्ट व ग्रे कलरचा हाफ पॅन्ट, गळ्यात हिरव्या रंगाचा धागा, पायात सैंडल व सोबत हिरव्या रंगाची गेर असलेली सायकल असे आहे.सदर मुलाचा शोध, पत्ता अथवा माहिती मिळाल्यास रामनगर पोलीस स्टेशन येथे कळवावे असे आवाहन रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आली आहे.

Pages