लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह दोघांना पकडले - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह दोघांना पकडले

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:

नागपूर - एका आरोपीला खापा पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक व त्याच्या वाहनाची जप्ती टाळण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकांसह पोलीस शिपायाने 40 हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर शुक्रवारी 35 हजार रुपये लाच स्वीकारताना दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

ओम कलेगुरवार (28) राजुरा (जि -चंद्रपूर )ह. मुक्काम अधिकारी गाळे, खापा आणि दिनेश गिरडे (32) ह. मुक्काम खापा पोलीस गाळे, असे दोन्ही लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, एका 38 वर्षीय व्यक्तीवर खापा पोलीस ठाण्यात चोरीशी संबंधित गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास कलेगुरवार आणि गिरडे यांच्याकडे आहे. याचा फायदा घेत दोघांनीही आरोपीला तुझी अटक टाळण्यासह तुझ्या गाडीची जप्ती टाळायची असल्यास 40 हजार रुपये देण्याची मागणी केली. फिर्यादीला लाच द्यायची नसल्याने त्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यावरून सापळा रचून दोन्ही आरोपीला रंगेहात 35हजार रुपये लाच घेताना पकडले गेले. दोघांवर खापा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pages