श्री शिवाजी महाविद्यालयात विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


श्री शिवाजी महाविद्यालयात विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
राजुरा:मंगी बु. येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळा मंगी बु. येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे "युवकांचा ध्यास - ग्राम शहर विकास" या संकल्पनेवर आधारीत विशेष श्रमसंस्कार शिबीर नुकतेच उत्साहात संपन्न झाले.हे शिबिर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे आयोजित करण्यात आले होते.

या शिबीराचे उद्घाटन राजुरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यध्यक्ष संजयभाऊ धोटे उपस्थित होते. तसेच या उद्घाटन कार्यक्रमास या संस्थेचे सचिव श्री अविनाश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

रॅली, पथनाट्ये,शोषखड्डे निर्मिती, बंधारा बांधणे श्रमदानातून स्वछता च्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे देने व ग्राम विकासासाठी युवाशक्ती यातूनच राष्ट्र निर्मितीसाठी युवक तयार होतील सोबतच स्वच्छ भारताची संकल्पना पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान सहभागी विध्यार्थ्यांना प्रबोधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे हा या विशेष श्रमसंस्कार शिबीराचा प्रमुख उद्देश होता.खेळ, कवायत व योग साधनेसोबतच सुदृढतेचे धडे देणे व सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान प्रबोधनच्या माध्यमातून सहभागी विध्यार्थ्यांपर्यन्त पोहचवणे यासाठी रोज सकाळी योगनृत्याचे, सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आलेले होते.

या शिबीरात प्रबोधनाच्या सत्रात सहभागी स्वयंसेवकांना व ग्रामस्थाना मा. न्यायाधीश श्रीमती डी. आर. भंडारी दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर तथा न्यास दंधाधिकारी प्रथम श्रेणी राजुरा यांनी पोक्सो कायदा आणि सायबर क्राइम जागरुकता, श्री अविनाश पोईनकर यांनी "युवकांचा ध्यास-ग्राम शहर विकास", चंद्रपूर येथील पर्यावरण अभ्यासक श्री सुरेश चोपणे यांनी "पर्यावरण समस्या आणि युवक", डॉ शरद बेलोरकर यांनी "लोकशाही बळकटीसाठी युवकांची भूमिका", राजुरा अशा विविध विषयावर प्रबोधनपर व्याख्याने देवून सहभागी विद्यार्थ्यांपर्यंत वरील विषयांचे ज्ञान विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पोहचवले.या शिबीरात श्रमदानाच्या गावातील सौंदर्यीकरणच्या भागात माती टाकून सौंदर्यीकरण केल्या गेले. गावात तसेच शाळेच्या परिसरात शोषखड्ड्याची निर्मिती, ग्रामस्वच्छता आदी कामे करण्यात आली.

या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी गावात फेरी काढून शेतकरी आत्महत्या, एड्स जनजागृती, मतदान जनजागृती, स्वच्छ भारत अभियान, हागणदारीमुक्त गाव, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन,बेकारी निर्मूलन, स्त्री -भ्रुण हत्या, सुदृढ भारत समृध्द भारत आदी विषयांवर पथनाट्य सादर केली, व गावात प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन बिमा,प्रधानमंत्री उज्वला योजना, पारंपरिक ऊर्जास्रोत, जलसंवर्धन, प्लॅस्टिक फ्री इंडिया, ग्रीन व्हिलेज, कोविड लसीकरण जनजागृती, विजेची बचत, कॅशलेस इंडिया, डिजिटल इंडिया, HIV जनजागृती, प्रौढ साक्षरता, लिंग समानता, मतदान जनजागृती, आयुष्यमान भारत योजना अशा विविध विषयांवर जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.हे शिबीर ग्युवकांचा ध्यास - ग्राम शहर विकास या संकल्पनेवर आधारीत असल्याने यासाठी युवकांना प्रेरणादायी ठरेल अशा विविध विषयांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराच्या मनोरंजनाच्या सत्रात सहभागी विध्यार्थ्यांनी शेतकरी आत्महत्या, एड्स जनजागृती, मतदान जनजागृती, बेकारी निर्मूलन, स्त्री -भ्रुण हत्या, स्वच्छता अभियान, सुदृढ भारत समृध्द भारत, एक भारत श्रेष्ठ भारत आदी विषयांवर पथनाट्य सादर केली. सहभागी विद्यार्थ्यांचे व गावकऱ्यांचे मनोरंजन केले.

शिबीराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारीववृंद, जि. प. उच्च प्राथमिक शाळा मंगी बु. चे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारीवृंद, ग्राम पंचायत मंगी बु. चे सरपंच, उपसरपंच, ग्राम विकास समितीचे अध्यक्ष, ग्रामसेवक तसेच इतर प्रतिष्ठित नागरिक आदींचा समावेश आहे.

शिबिराचा समारोप संस्थेचे सहसचिव मा. दौलतराव भोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे सचिव मा. अविनाश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. समारोप कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते शिबीरात सहभागी झालेल्या विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की, डॉ. सारिका साबळे, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. चेतना भोंगाडे, प्रा. विठ्ठल आत्राम सहाय्यक समितीचे सदस्य डॉ. आनंद रायपुरे, प्रा. सुवर्णा नलगे, डॉ प्रमोद वसाके, स्वयंसेवक प्रतीक डाखरे सोबतच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Pages