खबरकट्टा/चंद्रपुर :
भद्रावती तालुक्यातील तिरवंजा येथे बहिनीला पैश्यासाठी तगादा लावत मारहाण करणाऱ्या भाऊजीची साळ्याच्या मारहाणीने हत्या झाल्याची घटना घडली आहे. दयाल रायपुरे असे मृतकाचे नाव आहे तर गंगाधर चुणारकर असे आरोपी साळ्याचे नाव आहे.
भद्रावती पोलीस स्टेशन हद्दीतील तिरवंजा गावातील गंगाधर चुणारकर याच्या बहिणीचा पती दयाल रायपुरे हे दोघेही तिरवंजा येथे राहत होते. दयाल रायपुरे आपल्या पत्नीला पैश्यासाठी नेहमी तगादा लावायचा वारंवार पत्नीला मारहाण करायचा यामुळे घटनेच्या एक दिवस आधी दयाल याने पत्नीला मारहाण करत पत्नीला घराबाहेर काढले यामुळे ती आपला भाऊ गंगाधर चुणारकर याच्या घरी गेली.
शनिवारी दिनांक 4 रोजी दयाल हा गंगाधर च्या घराजवळ शिवीगाळ करायला लागला यात दोघांत शाब्दीक वाद झाला त्यानंतरच्या रागाच्या भरात गंगाधर ने लोखंडी रॉडने दयाल ला मारहाण केली यात दयाल गंभीर जखमी झाला त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान दयाल चा मृत्यू झाला.
भद्रावती पोलिसांनी आरोपी गंगाधर चुणारकर याला अटक केली आहे.
पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.
