WCL बंकर ला भीषण आग : लाखो रुपयांचे मशीन जळून खाक - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


WCL बंकर ला भीषण आग : लाखो रुपयांचे मशीन जळून खाक

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

आज शनिवार 04 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात चंद्रपूर -घुग्गुस लगत असलेल्या (WCL) वणी नॉर्थ अंतर्गत निलजाई कोळसा खाणीच्या क्रशर-कोल हँडलिंग पॉईंट (CHP) मध्ये अचानक मोठी आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही मात्र वेकोलीचे (डब्ल्यूसीएल) लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

माहितीनुसार, वेकोली (WCL) परिसरातील निलजाई कोळसा खाणीतून दरवर्षी लाखो टन (MT) कोळशाचे उत्पादन होते. आणि या बंकरमधून दररोज हजारो मेट्रिक टन (MT) कोळशावर प्रक्रिया केली जाते. हे काम रखडल्याने वेकोली (डब्ल्यूसीएल)चे मोठे नुकसान झाले आहे.

अधिक माहितीनुसार, CHP क्रेसर येथे वेल्डिंगचे काम सुरू होते, काम सुरू असतानाच वेल्डिंग मशीनच्या ठिणगीने पेट घेतला आणि लाखो रुपयांचे मशीन जळून खाक झाले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, येथे काम करणाऱ्या लोकांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली?

Pages