खबरकट्टा/चंद्रपूर:
वरोरा तालुका मधील निराधाराना विविध समस्याना तोंड द्यावे लागत आहे. निराधार योजनेचे लाभार्थी हे वयोवृद्ध असतात तालुक्याच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना.इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना.#khabarkatta chandrapur
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थाच्या अर्जातील आवश्यक नसलेल्या त्रुटी काढून मानसिक त्रास तहसील मधील कर्मचारी देत असतात.योजनेच्या लाभार्थी यांनी अर्ज केला असेल व त्याच्यात काही त्रुटी असेल किंवा लाभार्थी पात्र किंवा अपात्र झाला असेल तर त्या संदर्भातील माहिती तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायत सूचना फालकावर लावण्याचा निर्णय झाला असताना. वरोरा तालुका मधील आता पर्यंत कोणत्याही ग्रामपंचायतच्या सूचना फलकावर तहसील कार्यलय यांनी यादी लावलेली नाही.त्यामुळे ग्रामीण भागातील निराधार योजनेच्या लाभार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.#khabarkatta chandrapur
याच समस्येची दखल घेत अखिल भारतीय सरपंच परिषद वरोरा यांनी वरोरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती तालुका अध्यक्ष विशालभाऊ पारखी. जिल्हा कार्यकारणी सदस्य नर्मदाताई बोरेकर. देवानंद महाजन. शंकर दडमल. निखिल हिवरकर .सुचिता ठाकरे.निर्मला दडमल.प्रतिभा मांडवकर.रुपवंती दरेकर.मंगला लेवाडे.ज्योती पोयाम. प्रकाश भेदरकर. ताई परचाके. व अखिल भारतीय सरपंच परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.#khabarkatta chandrapur
