राष्ट्रपती दौरा: गोंडवाना विद्यापीठातील दहाव्या दीक्षांत समारंभासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा गडचिरोली दौरा...#President Draupadi Murmu arrives in Gadchiroli for the 10th Convocation of Gondwana University - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


राष्ट्रपती दौरा: गोंडवाना विद्यापीठातील दहाव्या दीक्षांत समारंभासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा गडचिरोली दौरा...#President Draupadi Murmu arrives in Gadchiroli for the 10th Convocation of Gondwana University

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

गडचिरोलीः- राज्याच्या शेवटच्या टोकावरील, मागास, आदिवासीबहुल व नक्षलप्रभावित गडचिरोलीत 5 जुलै रोजी गोंडवाना विद्यापीठातील दहाव्या दीक्षांत समारंभासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार आहेत. यानिमित्ताने मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्री उपस्थिती लावणार आहेत. दरम्यान, गुप्तचर यंत्रणनेने राष्ट्रपतींच्या दौऱ्यास हिरवी झेंडी दाखवली असून सुरक्षेच्या दृष्टीने उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांचे सुरक्षाकवच तैनात केले जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.#khabrkatta chandrapur

शहरातील गोंडवाना विद्यापीठात 5 जुलैला सकाळी साडेदहा वाजता इमारत भूमिपूजन व दीक्षांत समारंभ मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थितीत राहणार आहेत. जिल्हा निर्मितीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रपती गडचिरोलीत येत आहेत. आदिवासी समूहातून आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासीबहुल जिल्ह्यात येत असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.#khabrkatta chandrapur

राज्यपाल रमेश बैस हे अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित राहणार आहेत. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे व प्रभारी कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी विशेष गुणवत्ता प्राप्त व प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थीनींना सुवर्ण पदक, आचार्य पदवी व पदवी प्रदान करण्यात येणार आहे.


Pages