एसआरपीएफ जवानाची सहकाऱ्याकडून निर्घृण हत्या...#Brutal killing of SRPF jawan by his colleague - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


एसआरपीएफ जवानाची सहकाऱ्याकडून निर्घृण हत्या...#Brutal killing of SRPF jawan by his colleague

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

गडचिरोली : राज्य राखीव बलाच्या जवानाने शेजारी राहणाऱ्या सहकाऱ्याची चाकूने भोसकून हत्या केल्याचं समोर आलं आहे. ही घटना सोमवारी (ता. ३) रात्री ११ वाजताच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथे घडली. दोन महिलांच्या वादातून एसआरपीएफ जवानाला जीव गमवावा लागल्याचं चित्र आहे.सुरेश मोतीलाल राठोड (30) असे मृत जवानाचे नाव आहे. तर मारोती संभाजी सातपुते (33) आरोपी आहे. दोघेही यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहेत
देसाईगंज शहरानजीकच्या विसोरा येथे राज्य राखीव बल गट क्रमांक 13 चे मुख्यालय आहे. तेथील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत सुरेश राठोड आणि मारोती सातपुते शेजारी वास्तव्य करीत होते. परंतु मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता.

सोमवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. अशातच मारोती सातपुते याने घरातून चाकू आणून सुरेशवर वार केले. यात सुरेशचा मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्य राखीव पोलिस बलामध्ये एकच खळबळ माजली आहे.

या प्रकरणी देसाईगंज पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याला 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस उपनिरीक्षक युनुस इनामदार घटनेचा तपास करीत आहेत.

Pages