खबरकट्टा/चंद्रपूर:
चिमूर तालुक्यातील अडेगाव (देश ) येथील घटना
चिमूर :- चिमूर तालुक्यातील अडेगाव देश येथील रहिवासी असलेले लक्ष्मण गजभिये अकरा वाजेपासून बेपत्ता होते एका व्यक्तीचा विहिरीत मृतदेह आढळल्याची घटना काल रात्री 7.30 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली मृत व्यक्तीचे नाव लक्षपती गजभिये वय- 45 अडेगाव देश येथील रहिवासी आहे दुपारी 11.00 वाजे पासून घरातून बेपत्ता असून नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचा पत्ता लागला नाही.#khabarkatta chandrapur
त्यांची नेहमी तबेत खराब असल्याचे बोलले जात आहे त्याना फीट येत असल्याची सांगितले जाते स्वतःच्या शेतातील असलेल्या नथ्थू गजभिये यांच्या विहिरीत नातेवाईकानी डोकावून पाहिले असता विहिरीत एका पुरुषाचा तरंगत असलेला मृतदेह आढळला अशी माहिती मोबाईलद्वारे चिमूर पोलीस स्टेशन चे निरीक्षक मनोज गभणे यांना दिली असताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदन साठी चिमूर उपरुग्णालय मध्ये हलविले आहे. या प्रकरणी चिमूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्तीला एक मुलगा व मुलगी आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.
