चंद्रपुर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूका 15 जानेवारी 2021 ला.* :- 18 जानेवारीला मतमोजनी#grampanchayt-elections - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


चंद्रपुर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूका 15 जानेवारी 2021 ला.* :- 18 जानेवारीला मतमोजनी#grampanchayt-elections

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपूरी:- 


एप्रिल ते डिसेबंर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी आयोगाकडून 20 नोव्हेंबर 2020 रोजी मतदार यादीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे‌. 


सदर कार्यक्रमानुसार 01 डिसेंबर 2020 रोजी राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये (मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हे वगळून) एकूण 14234 ग्रामपंचायतींसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच अंतिम मतदार यादी 1 डिसेंबरला प्रसिद्ध झाली असून या ग्रामपंचायतीच्या निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. 15 जानेवारी 2021 रोजी या सर्व ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असल्याचे राज्य निवडणुक आयोगाने आज ( दि. 11 ) काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.


सोबतच निवडणुकीचा आचारसहिंता लागू झाल्याचेही म्हटले आहे. 23 ते 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 4 जानेवारीला निवडणुक चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करणे. 15 जानेवारीला मतदान आणि 18 जानेवारीला मतमजोणी होणार असून 21 जानेवारीला अधिसुचना प्रकाशित होणार आहे.

Pages