चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या खांबाडा येथे ९ डीसेबंरला रात्री ७ वाजताच्या सुमारास एक अनोळखी महिला वय अंदाजे ५७ वर्षे हनुमान मंदिरात आकस्मिक रित्या मरण पावली सदर घटनेची माहिती खांबाडा येथील गावकर्यांना माहीत होताच त्यांनी भ्रमणध्वनी वरून पोलिसांना दिली माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले
सविस्तर वृत्त असे की सदर अनोळखी महिला ही अनेक दिवसांपासून वेडसर असल्यासारखी गावोगावी फिरत होती मागील काही ७ ते ८ महिन्यापूर्वी पासून ती खांबाडा या गावात हनुमान मंदिरामध्ये राहू लागली सदर महिला ही वेडसर व वयोवृद्ध असल्यामुळे गावातील लोकांना तिची दया आली आणि रोज कुणीतरी तिला जेवणाचा डबा देत असे त्यामुळे ती हनुमान मंदिरात राहू लागली.
सदर महिलेला गावकरी तिची ओळख विचारू लागले तर तिची भाषा लोकांना समजत नव्हती कारण ती परराज्यातील असल्यामुळे ती मराठी व हिंदी बोलू शकत नव्हती परंतु एक असहायय निराधार व वेडसर महिला म्हणून गावकऱ्यांनी तिची खानपान ची व्यवस्था केली परंतु काल रात्री च्या सुमारास तिचा आकस्मिक मृत्यू झाला ही बाब गावकर्यांना कळताच त्यांनी पोलीसाना सदर घटनेची माहिती दिली.
लगेच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सदर मृत महिलेला पुढील कारवाई करिता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले असून मर्ग दाखल करुन सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर पी गायकवाड करीत आहेत.
