राजकीय ब्रेकिंग : आ बंटी भांगडिया यांच्या विरोधात दोन ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल होणार.. !! नागपूर न्यायालयाने दिले आमदार बंटी भांगडिया यांचे विरोधात दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्याचे आदेश#bhangdiya - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


राजकीय ब्रेकिंग : आ बंटी भांगडिया यांच्या विरोधात दोन ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल होणार.. !! नागपूर न्यायालयाने दिले आमदार बंटी भांगडिया यांचे विरोधात दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्याचे आदेश#bhangdiya

Share This
खबरकट्टा / नागपूर : 


नागपुरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अँड. तरुण चतुरभाई परमार , १८, भूपेश नगर , पोलीस लाइन्स टाकली मागे, नागपूर यांनी पोलीस स्टेशन सक्करदरा, नागपूर आणि पोलीस स्टेशन इमामवाडा येथे चिमुरचे आमदार कीर्तीकुमार मितेश भांगडीया यांचे विरुद्ध नागपूर सुधार प्रन्यासचे वेगवेगळे २ फ्लॅट  लबाडीने आणि जाणीवपूर्वक बळकाविल्या बाबत तक्रार दिली होती. 

प्राप्त माहितीप्रमाणे, या तक्रारीवर संबधित पोलीस स्टेशन आणि पोलीस उपायुक्त परी. क्र. ४ यांनी कारवाई न केल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात वेगवेगळे दोन प्रकरणे त्यांनी दाखल केली होती.

प्रकरण जनप्रतिनिधी याचे विरूद्धचे खटल्याविरुद्ध्चे प्रकरणाकरिता विशेष न्यायालय प्रथम श्रेणी न्यायाधिश कोर्ट क्र. ३ नागपूर श्री देशमुख यांचे न्यायालयात स्थानांतरीत झाले . याचिकाकर्ते श्री परमार यांचे वतीने अँड. वैभव जगताप यांनी कामकाज पहिले. 

हे प्रकरण अधिक तांत्रिक आणि गुंतागुंतीचे असल्याने वास्तुविशारद आणि न्यायवैधकतज्ञ तसेच गुन्हेशास्त्रातज्ञ अँड. सतीश उके यांनी यात मा. न्यायालयात याचिकाकर्ते यांचे करिता दोन्ही प्रकरणात युक्तिवाद केला आणि बाजू मांडली . मा. न्यायालयाचे केस स्टेटस याप्रमाने दि. २४.१२.२०२० रोजी मा. न्यायालयाने दोन्ही प्रकरणात पूर्ण सुनावनीअंती या याचिका मंजूर केल्या आहेत. 

याअर्थी संबधित पोलीस स्टेशन यांना आता चिमुरचे आमदार कीर्तीकुमार मितेश भांगडीया याचे विरुद्ध भा. दं. वी. चे कलम १९९, २००, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा नोंदवून तपास करावयाचा आहे !

Pages