गोडगाव ते सुकनेगाव रस्ता दाखवतोय ये जा करणाऱ्याना वाकुल्या?....... रस्त्याची दयनीय अवस्था :- या रस्त्याकडे कोणी लक्ष देणार काय?, गावकऱ्यांची आर्त हाक .... ग्रामवासियांनी लोकप्रतिनीधीनां दिले होते निवेदन.#wani - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


गोडगाव ते सुकनेगाव रस्ता दाखवतोय ये जा करणाऱ्याना वाकुल्या?....... रस्त्याची दयनीय अवस्था :- या रस्त्याकडे कोणी लक्ष देणार काय?, गावकऱ्यांची आर्त हाक .... ग्रामवासियांनी लोकप्रतिनीधीनां दिले होते निवेदन.#wani

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : वणी :- सुरज चाटे


वणी तालुक्यातील गोडगाव ते सुकनेगाव हा चार किलोमीटरचा रस्ता आहे, मात्र या रस्त्याची मोठी दयनीय स्थिती झाली असून येथील जणू रस्त्यावर गोटयांचा सडाच दिसत असून ये जा करणाऱ्या नागरिकांना जणू हा रस्ता वाकुल्या दाखवत असल्याचाच प्रश्न या दयनीय अवस्थेतील रस्ता मार्गक्रमण करतांना वाहन चालकांना पडत आहे.

सदर रस्त्याची निर्मिती 1970 ते 1975 या काळात केली होती तेव्हा पासुन या रस्त्याचे डांबरिकरण किंवा खडिकरण झाले नाही त्यामुळे रस्ता आता संपुर्ण मरनावस्थेत असुन या रस्त्याने चालने सुद्धा कठिण होत आहे याच मार्गावर तालुक्यातील सुकनेगाव व ईजासन (गो) येथील प्रसिद्ध मंदिरे आहे तसेच गोडगाव व ईजासन येथील नागरिकांना तहसिल कामाकरिता वणीला फेऱ्याने कायर या गावावरुन जावे लागत होते. ते अंतर त्यांना सत्ताविस किलोमीटर पडतात तर सुकनेगाव ते गोडगाव हा मार्ग तयार झाल्यास त्यांना वणी हे ठिकाण सोळा किलोमीटर पडतात म्हणुन आमचा फेरा कमी होईल आम्हाला जाणे सोईचे होईल. 


या करिता जुंलै 2020 ला प्रतिनिधिंना निवेदन दिले होते पण रस्ता अजुनही दुर्लक्षित आहे.त्यामुळे हा रस्ता अखेर बनणार तरी केव्हा हाच मोठा प्रश्न निर्माण झाला असून येथून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना मानेचे, मणक्याचे, पाठीचे आदी विविध आजाराने डोके वर केले आहे. 

सदर रस्त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज झाली असून यामुळे अनेक गावांचे अंतर सुद्धा कमी होणार असून छोट्या मोठ्या अपघाता च्या समस्या सुद्धा सुटणार आहे त्यामुळे संबंधित विभागाने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष केंद्रित करून यावर तोडगा काढावा अशीच जणू हाक परिसरातील नागरिक एकजुटीने देत आहे.

🛕प्रसिद्ध मंदिरांत दूरवरून येतात यात्रेकरू.....
     येथीलच जवळ असलेले व याच मार्गाने दूरवरून काही काही यात्रेकरू येत असल्याने त्यांना सुद्धा दर्शनाला येण्या करिता प्रचंड त्रास सहन करीत यावे लागते करिता याची दखल घेत तात्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Pages