वाघांसाठी जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांना आनलाईन बुकिंग व स्पॉट बुकिंग अशी सुविधा असते पण चिमूर तालुक्यातील नवेगाव प्रवेशद्वार येथे चक्क वनविभागाच्या वनरक्षक आणि खाजगी एजंट यांनी मिळुन परस्पर अधिकचे पैसे घेऊन स्वतःच्या खिशात टाकत होते.
कुठल्याही प्रकारची नोंद शासनाच्या वनविभागाला नोंद घेतली जात नव्हती असा हा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. याबाबत १ डिसेंबर ला प्रत्यक्ष एका पर्यटक पाळताळणीत हे प्रकरण उघडकीस आल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी ताडोबा यांचे तक्रारीवरून चिमूर पोलिसांनी वनरक्षक टेकचंद रूपचंद सोनुले (वय २८ वर्ष) रा.खडसंगी व खाजगी एजंट ईसम सचिन संतोष कोयचाडे (वय २७ वर्ष) रा. खडसंगी यांचे विरुद्ध अप क्र . ४२७/२०२० कलम ४०९, ४२० ,३४ भा द वि नुसार गुन्हा नोंद केला असून दोन्हीं आरोपींना अटक केली होती. यात दोन्ही आरोपीना चार दिवसाचा पिसीआर ठेवण्यात आला असून, चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्प संरक्षीत वन असुन अधिकृत परवाना देऊन व्याघ्रदर्शन केले जाते. चिमूर तालुक्यातील नवेगाव प्रवेशद्वार मधून ऑनलाईन बुकिंगच्या दररोज ०६ जिप्सी गाड्या सोडल्या जाते परंतु ०६ जिप्सी गाड्यापैकी ऑनलाईन बुकिंगच्या जर ४ गाड्या बुकिंग असेल तर उर्वरित गाड्या वनरक्षक टेकचंद रूपचंद सोनुले स्वतः पैसे घेऊन गेटवर कोणतीही नोंद न घेता सोडत असल्याची गोपनीय माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी ताडोबा यांना तक्रार प्राप्त झाली होती.
त्यावरून चौकशी केली असता खाजगी इसम नाम सचिन संतोष कायचाडे (वय २७ वर्ष) रा. खडसंगी हा मोबाईल वरून मल्टीमिडीयाच्या माध्यमातून ताडोबामध्ये जंगल सफारीकरीता बुकिंग करून देतो अशी माहिती मिळाल्यावरून स्वतः वनविभागाच्या खात्याअंतर्गत सापळा रचून सदर मोबाईल नंबरवर संपर्क साधून एका गाडीची नवेगाव गेट येथून ताडोबामध्ये जंगल सफारीकरीता बुकिंग दि. ०१/१२/२०२० रोजी करण्यात आली होती.
सदर बुकिंग बाबत एकुण ९ हजार रुपये फोनपे व्दारे देण्यात आले सदर वाहन सफारीकरीता नवेगाव गेट येथून सोडण्याकरीता चौकशी केली असता, सदर गेटवर शासकिय कर्मचारी वनरक्षक नामे टेकचंद रूपचंद सोनुले (वय २८) वर्ष रा.खडसंगी व खाजगी ईसम सचिन संतोष कोयचाडे (वय २७) वर्ष रा. खडसंगी हे दोघ मिळून संगणमत करून आपल्या अधिकाराचा गैरवापर करून नगदी पैसे घेऊन वाहने सफारी करीता सोडत असल्याबाबत समजले, त्यांना विश्वासात घेऊन सदर अपहाराबाबत सखोल विचारपूस केली असता अशा प्रकारे मागिल बरेच दिवसापासून असा प्रकार चालू असल्याचे माहिती वनविभागाच्या लक्षात ही बाब आली त्यामुळे सदर प्रकारनाबाबत खात्या अंतर्गत सखोल चौकशी करण्यात आली असून, त्याचा सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविण्यात आला.
दि. ०१/१२/२०२० रोजी १६:०० वा. सुमारास चिमूर तालुक्यातील नवेगाव गेट (खडसंगी) येथे कर्तव्यावर हजर असलेले वनरक्षक नामे टेकचंद रूपचंद सोनुले (वय २८) वर्ष रा. खडसंगी व सचिन संतोष कोयचाडे (वय २७ वर्ष) रा. खडसंगी हे संगणमत करून शासनान दिलेल्या नियमाचे शतीचे, अटीचे उल्लघन करून वैयक्तिक स्वार्थाकरीता वाहनाच्या बुकिंगचे नगदी पैसे घेवून जंगल सफारी करीता वाहने सोडून शासनाची फसवणूक करून पैशाचा अपहार करीत होते.
करीता त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही होणे करिता पोलीस स्टेशन चिमूर येथे वनपरिक्षेत्र अधिकारी ताडोबा यांनी लेखी रिपोर्ट देत कार्यवाही करण्याची तक्रार दिली होती. तक्रारीवरून चिमूर पोलिसांनी वनरक्षक टेकचंद रूपचंद सोनुले (वय २८) वर्ष रा.खडसंगी व खाजगी एजंट ईसम सचिन संतोष कोयचाडे (वय २७) वर्ष रा. खडसंगी यांचे विरुद्ध अप क्र . ४२७/२०२० कलम ४०९, ४२० ,३४ भा द वि नुसार गुन्हा नोंद केला असून दोन्हीं आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी चार दिवसाचा पिसीआर घेतला असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली.
सदर प्रकरणाची वनपरिक्षेत्र अधिकारी कोलारा (ताडोबा) यांनी सखोल चौकशी केली असता, पर्यटकाकडून कापण्यात आलेल्या पावत्यात सुद्धा गैरप्रकार आढळून आले असल्याचे वनविभागांनी सांगितले. याबाबद्दचा सविस्तर अहवाल वनपरिक्षेत्र अधिकारी कोलारा यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे सोपविला असता, दिलेल्या अहवालानुसार वनरक्षक सोनुले यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 च्या नियम 4 च्या पोटनियम (एक) अनव्ये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून याद्वारे वनरक्षक सोनुले यांना दिलेल्या आदेशाचे तारखेपासून निलंबित करण्यात आले आहे. आणखी असाही आदेश देण्यात आला आहे की, हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत वनरक्षक सोनुले नवेगाव गेट (वन्यजीव) कोलारा परिक्षेत्र यांचे मुख्यालय वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) ताडोबा स्थित वडाळा येथे राहील.
सोनुले वनरक्षक नवेगाव गेट (वन्यजीव) कोलारा परिक्षेत्र यांना निम्नस्वाक्षरीकर्ते यांचे पूर्वपरवानगी शिवाय वनरक्षक सोनुले यांना मुख्यालय सोडता येणार नसून, सोनुले वनरक्षक नवेगाव गेट (वन्यजीव) कोलारा परिक्षेत्र यांना त्यांचे निलंबन कालावधीत महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहन अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन बदतर्फी व सेवेतून काढून टाकणे) नियम 1981 मधील नियम 69 चे अधीन राहून नियम - 68 चे अनुषंगाने देय असलेला निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहील. असे निलंबित केलेल्या आदेशात म्हटले आहे. सदर ची निलंबनाची कारवाई उपसंचालक (कोअर) ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प यांनी केलेली आहे.
