राष्ट्रवादी परिवार सवांद यात्रा" खा. शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 'संवाद कार्यकर्त्यांशी,पक्षाच्या केंद्रबिंदूशी' या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथून २८ जानेवारी रोजी या दौर्याची सुरुवात होणार आहे. सलग १७ दिवस सुमारे ३ हजार किमींचा प्रवास करत विदर्भ, खानदेशातील १४ जिल्हे, ८२ मतदारसंघाचा आढावा संवाद यात्रेच्या माध्यमातून घेतला जाणार आहे.
दौऱ्यात पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाईल. गडचिरोली,चंद्रपूर,भंडारा,गोंदिया, यवतमाळ,वाशिम,नागपूर,वर्धा,अमरावती,अकोला,बुलडाणा,जळगाव,धुळे,नंदुरबार या १४ जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांच्या अडचणी लक्षात घेतल्या जातील व पक्ष वाढवण्यासाठी रणनीती आखली जाईल.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचा गडचिरोली - चंद्रपूर जिल्ह्याचा "राष्ट्रवादी परिवार संवाद" दौरा कार्यक्रम या प्रमाणे..
🔷 दि. २८ जानेवारी :
- अहेरी येथून गडचिरोली येथे दु.१.०० वा.आगमन,
- दु.१.०० ते १.३० राखीव.
- गडचिरोली विधानसभा बैठक :- दु १.३० ते २.३०
- दू.२.३० ते ३.०० कार्यकर्ता भेट
- दु.३ वा.गडचिरोली हून वडसा देसाईगंज कडे रवाना.
- दु.३.४५ ते ४.३० वडसा देसाईगंज येथे - आरमोरी विधानसभा बैठक.
- दु.४.३० ला ब्रम्हपुरी कडे प्रयाण
- सायं ५.०० ते ५.४५.ब्रम्हपुरी विधानसभेची बैठक.(स्थळ:- नेवजाबाई हितकरणी कॉलेज)
- ४.४५ ते ६.०० श्री.अशोक भैय्या यांच्या कडे राखीव राखीव
- सायं.६.०० वा मुल कडे रवाना
- सायं.७.३० ते ८.१५ मुल येथे बल्लारपूर विधानसभा बैठक(स्थळ :- नवभारत विद्यालय)
- ८.१५ ते ९.०० राखीव
- ९.०० ला चंद्रपूर कडे प्रयाण.
- १०.०० ला चंद्रपूर येथे आगमन व मुक्काम.
🔷 दि.२९ जानेवारी :
- स.९ ते १० - जलसंपदा विभागाची आढावा बैठकीस उपस्थिती
- स. १० ते १०.४५ - चंद्रपूर शहर जिल्हा कार्यकारिणी बैठकीस उपस्थिती
- स.१०.४५ ते ११.३० - चंद्रपूर विधानसभा बैठक (स्थळ :- जनता महाविद्यालय सभागृह)
- ११.३० ते १२.१५ - राजुरा विधानसभा बैठक(जनता महाविद्यालय सभागृह)
- १२.१५ ते १- चंद्रपूर जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीची बैठक(जनता महाविद्यालय),
- १ ते १.४५ राखीव
- १.४५ वा. वणी जि.यवतमाळ कडे घुग्गुसमार्गे प्रयाण.
- २.० ते २.०५ घुग्गस येथे स्वागत व वणी कडे रवाना
- २.३० ते ३.१५ वणी विधानसभा बैठकीस उपस्थिती.
- दू.३.४५ ते ५ वरोरा विधानसभा बैठक व सभेस उपस्थिती.
- सायं ५.०० वा चिमुरकडे रवाना
- ६.३० ते ७.१५ चिमूर विधानसभा बैठक
- ७.१५ वा.भिवापूर कडे रवाना
या दौऱ्यात मा.जयंत पाटील यांच्या सोबत मा.प्रफुल पटेल,ना.अनिल देशमुख,महिला प्रदेश अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर,त्याचबरोबर युवक,विद्यार्थी,युवती, व पक्षाच्या विविध सेलचे प्रदेश अध्यक्ष उपस्थित राहणार असल्याने जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्हाध्यक्ष rajen वैद्य यांनी केले आहे.


