प्राविण्य प्राप्त : अॅड यादवराव धोटे महाविद्यालय राजुरा गोंडवाना विद्यापिठाच्या बी.एफ.डी. अभ्यासक्रमाच्या गुणवत्ता यादीत प्रथम #rajura - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


प्राविण्य प्राप्त : अॅड यादवराव धोटे महाविद्यालय राजुरा गोंडवाना विद्यापिठाच्या बी.एफ.डी. अभ्यासक्रमाच्या गुणवत्ता यादीत प्रथम #rajura

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा( २६ जानेवारी २०२१) -

अॅड यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी राजूरा व्दारा संचालित अॅड यादवराव धोटे स्मृती महाविद्यालय राजुरा (३५४) हे गोंडवाना विद्यापिठ गडचिरोलीशी संलग्नीत असून मागील बऱ्याच वर्षापासून यशाची परंपरा कायम राखून पून्हा एकदा महाविद्यालयाच्या यशात मानाचा तुरा लागलेला आहे. महाविद्यालयात मागील सत्र २००६ पासून दरवर्षी अंतीम वर्षाचा निकाल १०० टक्के असतोच. 


यावर्षीच्या (उन्हाळी २०२० ) निकालातही गोंडवाना विद्यापिठाअंतर्गत बॅचलर आफॅ फॅशन डिझाईन हा अभ्याक्रमाच्या शैक्षणिक सत्र २०१९-२० चा अंतीम वर्षाचा निकाल जाहीर झाला. 

विद्यापिठाने नुकत्याच दिनांक १८ जानेवारी २०२१ ला जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीच्या अधिसूचनेत कु. अपेक्षा दादाजी कातकर या विद्यार्थीनेने १०.०० पैकी एकूण ८.३० सीजीपीए घेउन विद्यापिठातून या अभ्याक्रमात प्रथम मेरीट तर कु. प्रतिभा लक्ष्मण घुगुल या विद्यार्थीनेने १०.०० पैकी एकूण ८.२८ सीजीपीए घेउन विद्यापिठातून व्दितीय मेरीट येण्याचा मान मिळवलेला आहे. 

या सर्व विद्यार्थीनीचे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मा. श्री सुधीरभाऊ धोटे, अध्यक्ष अॅड. यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी राजुरा व मा. अॅड संजयभाऊ धोटे माजी आमदार राजुरा विधान सभा क्षेत्र तसेच उपाध्यक्ष अॅड. यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी राजुरा, तसेच संस्थेचे कोषाध्यक्ष मा. श्री सतीशभाऊ धोटे व सचिव मा. श्री. अॅड. अर्पित धोटे, मा. श्री. मोहन धोटे तसेच प्राचार्य तथा प्राध्यापकवृंद यांनी विद्यार्थीनीचा सत्कार तथा अभिनंदन करीत पुढील शैक्षणिक वाटचालीकरिता भरभरून शुभेछा दिल्या आहेत.


Pages