आज वणी तालुक्यातील 74 ग्राम पंचायतीच्या 502 जागांकरिता मतदान.... शासकीय यंत्रणा सज्ज :- आज उमेदवारांचे भाग्य मतपेटीत कैद होणार #wani - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


आज वणी तालुक्यातील 74 ग्राम पंचायतीच्या 502 जागांकरिता मतदान.... शासकीय यंत्रणा सज्ज :- आज उमेदवारांचे भाग्य मतपेटीत कैद होणार #wani

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : वणी :- सुरज चाटे


ग्राम पंचायतीचा बिगुल वाजताच सर्वत्र गांव पुढारी कामाला लागली होते, राब राब सर्वत्र प्रचार करून मात्र आता मतदारांनी कुणाला पसंती दिली? याचा निकाल मात्र आज मतपेटीत कैद होणार असून शासकीय निवडणूक यंत्रणा मात्र सज्ज दिसून येत असून पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त दिसून येत आहे तर गांव खेड्याकरिता बसेस सुद्धा रवाना करण्यात आल्या आहे, कोण कुणावर कितीने भारी पडतो? हे अजून तरी स्पष्ट नसले तरी मतदारांनी आपला कौल कुणाकडे दाखवला असावा हे मात्र मतमोजणी झाल्यावरच स्पष्ट होणार आल्याचे चित्र दिसत आहे. 

कार्यकर्ते नेते व आदी वणी तालुक्यातील 74 ग्राम पंचायती मधील गाव पुढारी या निवडणूक प्रक्रिये करिता आपला उमेदवार निवडणूक आणण्याकरिता झटताना दिसले मात्र या 74 ग्राम पंचायती मधील 502 जागांकरिता 83,584 मातदाता आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, ही निवडणूक प्रक्रिया तालुक्यातील 258 केंद्रावर होणार असून याकरिता 284 अधिकाऱ्यांना नेमण्यात आले आहे. मात्र आता कोणता उमेदवार निवडून आणायचा व कोणाला मिनी मंत्रालयात? जागा द्यायची याचा अधिकार मतदार राजानी आज मतपेटीत कैद केला असून विविध ग्राम पंचायती मधील शासकीय निवडणूक यंत्रणा देखील सज्ज झाली असून पोलीस विभागाचा फौज फाटा देखील सज्ज दिसत आहे. 


🔷 मिनी मंत्रालयाचा राजा कोण होणार? अद्यापही अस्पष्ट 
ग्राम पंचायत ही सर्वत्र मिनी मंत्रालय म्हणून परिचित आहे दरम्यान या मिनी मंत्रालयाचा राजा म्हणजेच सरपंच कोण होणार?. याकडे मात्र साऱ्यांच्या नजरा लागल्या असून हे अजूनतरी अस्पष्टच असून तो कसा निघणार? हे मात्र निवडणूक प्रक्रियेचा निकाल आल्यावरच हे कोडे सुटणार असल्याचीच चर्चा जोर धरत आहे.

Pages