सोमनाथ येथे चौकीदाराची निर्घृण हत्या : धारदार शास्त्राने हत्या करुण मृतदेह पाण्यात फेकला #Brutal murder of a watchman at Somnath - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


सोमनाथ येथे चौकीदाराची निर्घृण हत्या : धारदार शास्त्राने हत्या करुण मृतदेह पाण्यात फेकला #Brutal murder of a watchman at Somnath

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


मूल प्रतिनिधी - सोमनाथ प्रकल्पातील बेपत्ता इसमाचा धारदार हत्याराने भोकसून खून झाल्याची घटना  उघडकीस आली. Brutal murder of a watchman at Somnath


थोडक्यात माहिती नुसार सोमनाथ प्रकल्प येतील नारायण निकोडे वय र्वष 75 रा मु. गेवरा ता सावली हा दि. 6/9/08 पासुन सोमनाथ कूष्टरोगि सेवा समिती मध्ये भर्ति होता. निकोडे चौकीदार म्हणून शेतावर देखरेख करण्याचे काम करीत होता. 


तो दि. 20/1/21 सायंकाळ पासून बेपत्ता होता अशी तक्रार मुल पोलिस स्टेशन ला मिळाली होती दि. 21/1/21 ला सकाळ पासुन मुल पोलिस स्टेशन चे कर्मचारी तथा वन विभागचे कर्मचारी यांनी संयुक्त रित्या शोध मोहीम राबवित जंगलात शोध घेतला असता त्याचा राहत्या घराचा मागील भागात बंधारा च्या पाण्यात त्याचे शव दुपारी 2.00 वाजता च्या दरम्यान दिसले. 

त्याचा शरिरावर व पोटावर टोकदार व धारदार हत्याराने भोसकल्याचि जखम होती व पाठी मागिल बाजु सुध्दा मोठी जखम होती या तपासा वरुण त्याची हत्या झाल्या चे स्पष्ट होते. 


घटना पंचनामा प्राथमिक पाहणीवरून  अज्ञात आरोपि विरुध्द भा.द.वी. 302 अन्वये गुन्हा दाखल करुण पुढील तपास उप-विभागीय पोलिस अधिकारी अनुज तारे यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीशसिंग राजपूत तथा टिम साहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज गदादे करीत आहे.



Pages