चंद्रपूर ब्रेकिंग : मनोहर पाऊनकरांना पुन्हा अटक..??? सीडीसिसी बँकेचं ऑडिट प्रकरण भोवणार ??? पालकमंत्री वडेट्टीवार गटाचा अटकेसाठी प्रशासनावर दबाव .?? संचालक रवी शिंदे यांची पाऊनकर विरोधात तक्रार #CDCC-chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


चंद्रपूर ब्रेकिंग : मनोहर पाऊनकरांना पुन्हा अटक..??? सीडीसिसी बँकेचं ऑडिट प्रकरण भोवणार ??? पालकमंत्री वडेट्टीवार गटाचा अटकेसाठी प्रशासनावर दबाव .?? संचालक रवी शिंदे यांची पाऊनकर विरोधात तक्रार #CDCC-chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गोमती पाचभाई -


चंद्रपूर नगर परिषदेत सलग पंधरा वर्षे निवडून आलेले आणि कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर च्या संचालकपदी काम केलेले जिल्ह्यातील हेवीवेट नेतृत्व म्हणून मनोहर पाऊनकर यांची ओळख होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून मनोहर पाऊनकर यांचा कार्यकाळ चांगलाच गाजला. काँग्रेसमधील वडेट्टीवार गटाशी त्यांचे वैर आहे. सीडीसीसी बँकेत अनुकंपा तत्वावर नौकरी भरतीच्या आरोपात त्यांना तुरुंगात जावे लागले होते. 


भारतीय दंड विधान संहितेतील विविध तरतुदीनुसार याआधीच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल व्हावा म्हणून दस्तुरखुद्द पालकमंत्री वडेट्टीवार यांनी प्रयत्न केले अशी खमंग चर्चा राजकीय गोटात आहे. सदर प्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केल्याने मनोहर पाऊणकर यांना तात्पुरता दिलासा मिळाला असे दिसते. तसेच त्यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देखील सोपवला आहे. वडेट्टीवार गटाचे रावत हे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून काम करत असताना तुरुंगाबाहेर आलेल्या पाऊनकरांची भीती त्यांना सतावत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँके तर्फे प्रतिनिधी म्हणून संचालक रवी शिंदे यांनी पुन्हा एक नविन तक्रार मनोहर पाऊनकर यांचे विरोधात रामनगर पोलीस स्टेशन येथे दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखा विभागामार्फत देखील या प्रकरणाची सखोल चौकशी होत आहेत. या प्रकरणात मनोहर पाऊनकर यांचे विरोधात भारतीय दंडविधान संहितेतील कलम 420,468,471 आदी तरतुदीनुसार कारवाई व्हावी म्हणून प्रशासनावर पालकमंत्री वडेट्टीवार गटाचा दबाव वाढत असल्याची चर्चा आहे.

सदर प्रकरणाबाबत पोलिसांनी सावध भूमिका घेतली असून आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीनंतरच गुन्हा नोंदवायचे की नाही हे ठरणार असल्याचे समजते. " सत्ते पुढे शहाणपण चालत नाही " असे म्हणतात. त्यामुळे पाऊनकर यांना नव्या प्रकरणात अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती वाटतं असल्याने जिल्हा न्यायालयासमोर त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज सादर केल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. 

नेमक्या प्रकरणाची परिपूर्ण माहिती हाती लागू शकली नसली तरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी काही चार्टर्ड अकांउंटंट्सला ई- केवायसी ऑडिट करण्याचे काम दिले होते. या कामासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक रक्कम चार्टर्ड अकांउंटंट्सला दिली गेली. अवाजवी प्रवास खर्च देखील चार्टर्ड अकांउंटंट्सला देण्यात आला असून त्यातून करोडो रुपयांची अफरातफर झाली अशा आशयाचे तक्रारदार यांचे आरोप असल्याचे समजते.

तर तक्रारदार शिंदे यांच्या मागे जिल्ह्यातील हेविवेट नेत्याचा अदृश्य हात असल्याचे बोलले जात आहे. ज्या कामाबाबत तक्रार दिली, त्या कामाची मंजुरी देताना तक्रारदार यांची देखील स्वाक्षरी असल्याची पाऊनकर गटात चर्चा आहे. तसेच केवळ राजकीय द्वेषातून ही कारवाई होत असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात आर्थिक गुन्हा शाखा विभागाकडून चार्टर्ड अकांउंटंट्सची देखील कसून चौकशी होत आहे. 

ऑल हतीन अँड कंपनी नागपूर, सुशील चंदवानी अँड कंपनी नागपूर आदी चार्टर्ड अकांउंटंट्स फर्मची चौकशी सुरू आहे. दरम्यान न्यायालयात प्रकरण क्रमांक 37/2021 नुसार मनोहर पाऊनकर यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दिला आहे. 

चार्टर्ड अकांउंटंट्समध्ये वडेट्टीवार गटाविरोधात नाराजी असून आम्ही केवळ प्रोफेशनल म्हणून दिलेले ई- केवायसी ऑडिटचे काम रीतसर केले आहे आणि तेव्हा या राजकीय वादात आम्हाला ओढवू नका असे त्यांचे म्हणणे असल्याचे समजते.

दरम्यान पोलीस पुन्हा पाऊनकर यांचे विरोधात गुन्हा नोंदवतील का ? आणि त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर होईल का ? हे येणाऱ्या काळात समजेलच. मात्र जिल्ह्यातील राजकारणात नवी ठिणगी पडली असून त्याचे रूपांतर वणव्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Pages