अ.भा.म.सा.परिषद चंद्रपूर ची कार्यकारणी घोषित : शहराध्यक्ष : कवी मधुकर श्रावण दुफारे ;तालुकाध्यक्ष : कवी सुशांत मुनगंटीवार ; सचिव : अतुल येरगुडे यांचीं नियुक्ती #chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


अ.भा.म.सा.परिषद चंद्रपूर ची कार्यकारणी घोषित : शहराध्यक्ष : कवी मधुकर श्रावण दुफारे ;तालुकाध्यक्ष : कवी सुशांत मुनगंटीवार ; सचिव : अतुल येरगुडे यांचीं नियुक्ती #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 



साहित्यिक,सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या ऊर्जानगर चंद्रपूर (जि.चंद्रपूर)येथील कवी मधुकर श्रावण दुफारे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे,विदर्भ विभागीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांचे निर्देशानुसार नागपूर विभागीय अध्यक्ष कवी सतीश सोमकुवर आणि नागपूर विभागीय सरचिटणीस जयेंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष नीरज आत्राम चंद्रपूर यांनी चंद्रपूर शहर (जि.चंद्रपूर)अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.


कवी मधुकर श्रावण दुफारे यांनी साहित्य क्षेत्रातील वंचित,तडागाडातील कवी,लेखक,साहित्यिक यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या आणि आपल्या कार्याच्या माध्यमातून एक विचारपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन साहित्य क्षेत्रातील कवी,कलावंत यांना दिले आहे.


त्यांच्या नियुक्तीबद्दल राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे,राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर ,विदर्भ विभागीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे,विदर्भ विभागीय सचिव प्रा.मिलिंद रंगारी,नागपूर विभागीय अध्यक्ष सतीश सोमकुवर,नागपूर विभागीय सरचिटणीस जयेंद्र चव्हाण,नागपूर विभागीय सदस्या कवयित्री सरिता रामटेके,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नीरज आत्राम,कवी सुनील बावणे,कवी प्रकाश पिंपळकर, कवी महेंद्र मंडपे, कवी गजानन माद्यसवार कवी संतोष उईके, कवीप्रवीण आडेकर, कवी नरेंद्र कन्नाके(नीरजकार), कवी परमानंद तिराणिक, अतुल येरगुडे, सौ.भारती लखमापुरे, सौ. मंजुषा दरवडे अरुण आगलावे कवी विशाल मोहूर्ले, कवयित्री सोनाली रायपुरे(सहारे), किशोर चलाख,दुशांत निमकर,महेश भामरे, संतोष मेश्राम आदींनी अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.


🔴 अ.भा.मराठी साहित्य परिषद ची चंद्रपूर तालुका कार्यकारिणी गठीत

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद तालुका शाखा चंद्रपूर ची तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. तालुका अध्यक्ष म्हणून पं. स. जिवती येथील जि. प. प्रा. शा.चिलाटीगुडा  येथे शिक्षक म्हणून कार्यरत असणारे स्थानिक चंद्रपूर येथील कवी श्री. सुशांत भास्करराव मुनगंटीवार यांची तर तालुका सचिव म्हणून तालुक्यातील प्रसिध्द कवी , नाटककार व राज्यभर शासनाच्या लोकोपयोगी कार्याचा प्रसार व जनजागृती करणारे कवी अतुल येरगुडे यांची निवड करण्यात आली आहे. 

तसेच कार्याध्यक्ष- म्हणून प्रसिद्ध कवी श्री गोपाल शिरपूरकर सर , उपाध्यक्ष -  श्री. महेश कोलावार , श्री. पवन श्रीवास्कर , कोषध्यक्ष - श्री. अभय दुर्गे ,सहसचिव - श्री. स्वप्नील मेश्राम ,प्रसिद्धी प्रमुख - श्री.राकेश शेंडे ,संपर्क प्रमुख - श्री. विघ्नेश्वर देशमुख ,संघटक - श्री.शेष देऊरमल्ले , महिला आघाडी - सौ.हेमलता मेश्राम तर मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध नाट्यकलावंत, फिल्म अभिनेते, कवी श्री. जगदीश नंदूरकर सर यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष श्री नीरज आत्राम सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
       
तालुक्यातील नवकवींना प्रोत्साहन देऊन साहित्य निर्मिती मध्ये अधिकाधिक तालुक्यातील योगदान कसे वाढवता येईल व वाचक वर्ग कसा वाढविता येईल याविषयी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित कार्यकारिणी ने विचार व्यक्त केले आहेत.  
   
नवनिर्वाचित कार्यकारिणी चे अ. भा. म.सा. परिषद चे विदर्भ विभागीय अध्यक्ष श्री. आनंदकुमार शेंडे , जिल्हाध्यक्ष श्री. नीरज आत्राम, कवी श्री संतोष उईके सर , दुशांत निमकर सर , संभाशिव गावंडे , संजय सेलोकर , अविनाश झाडे आदींनी स्वागत व अभिनंदन केले आहे तसेच त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Pages