सिंदेवाही पोलीस ठाणे परिसरात खुद्द फिर्यादीनेच गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहिती नुसार सिंदेवाही पोलीस ठाणे येथे फिर्यादी मृतक अशोक महादेव राऊत (वय 55 वर्ष), धंदा -मजुरी याने आपल्या घरगुती वादातून मद्य प्राशन करून मामा व मामाचा मुलगा शिवीगाळ करीत असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी दि 5 तारखेला पोलीस स्टेशन मध्ये आला होता. पोलीसांनी त्याची तक्रार घेतली व त्याला घराकडे रवाना केले.
त्यानंतर आज 6 जानेवारी 5:30 च्या दरम्यान पोलिस ठाणे परिसरात आला. त्याने स्टेशन डायरी च्या अमलदारास विचारले की मी दिलेल्या तक्रारीची कारवाई काय झाली? त्यावर अमलदाराने तक्रारकर्ता मद्य प्राशन करून असल्याने त्याला बाहेर बसण्यास सांगितले व तो बाहेर बसला. काहीवेळानंतर पोलीस विभागाचा एक कर्मचारी ठाण्यात येत असत्यावेळी त्याला एक इसम पोलीस स्टेशन च्या आवारात गळफास लाऊन बचावाकरिता फळफळताना दिसला. त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णलयात पोलिसांनी उपचारार्थ नेले परंतु त्याचा मृत्यू झाला असल्याचे निदान डॉक्टरांकडून आले.
मृतक अशोक राऊत हा सिंदेवाही येथील दसरा परीसरात आई सोबत वास्तव्यास असून अधिक माहितीकरीता घराचा शोध घेतला असता त्याची पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली असून आज अचानक घडलेल्या घटनेमुळे कोणीही अधिक माहिती देण्यास धजवाले नाही.

